Header AD

ठिणगी संस्थेने विधवा महिलांचे जीवनात फुलविले

भिवंडी : दि.२६ (प्रतिनिधी ) सौभाग्यवती महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम म्हणजे जणू आनंदाची पर्वणी परंतु हा आनंद विधवा महिलांच्या आयुष्यात ही यावा यासाठी ठिणगी  संस्थेच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथे आगळावेगळा हळदीकुंकू समारंभ घडवून आणत सौभाग्यवती महिलां सोबत विधवा महिलांचे औक्षण करून त्यांच्या कपाळी हळदीकुंकू करीत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न केला आहे.


          हळदीकुंकू करताना वापरली जाणारी हळद आरोग्याचे तर कुंकू शौर्याचे प्रतीक आहे .परंतु विधवा महिलांना त्यात सहभागी होता येत नसल्याने त्यांच्या मनात नाउमेद करणारी भावना निर्माण होत असल्याने ,समाजातील सर्व महिलांचा सन्मान झाला पाहिजे  तर त्यांना धैर्याने समाजात वावरत आले पाहिजे या साठी हा उपक्रम केला जात असल्याचे ठिणगी महिला जिल्हा पदाधिकारी जया पारधी यांनी नमूद केले. तर लक्ष्मी मुकणे या विधवा महिलेने पती निधना नंतर आपल्या अंगावरील सौभाग्याचे अलंकार उतरविण्यास विरोध करीत लढा दिला त्यातून आलेले अनुभव त्यांनी कथन केले. या कार्यक्रमात शेकडो महिलांच्या उपस्थितीत विधवा महिलांचा विशेष हळदीकुंकू सोहळा पार पडला
ठिणगी संस्थेने विधवा महिलांचे जीवनात फुलविले ठिणगी संस्थेने विधवा महिलांचे जीवनात फुलविले Reviewed by News1 Marathi on February 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads