६सेकंदात ६० हजारांचा मोबाईल हॉटेलच्या गल्ल्या वरून लंपास घटना सीसी टीव्हीत कैद
भिवंडी दि 21 (प्रतिनिधी ) हॉटेलामध्ये पानी पिण्याच्या बहाण्याने शिरलेल्या एका चोरटयाने हॉटेलच्या गल्ल्यावरील मालकाचा ६० हजार किमतींचा मोबाईल पलक झपकताच केवळ ६ सेंकदात लंपास केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे मोबाईल चोरीची घटना हॉटेलमधील सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरु केला आहे.
पानी पिण्याच्या बाहणाने शिरला होता हॉटेलमध्ये ....
भिवंडी शहरातील मुंबई - नाशिक जुन्या आग्रारोड वरील वंजारपट्टी नाका परिसरात बारदिश हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये एक चोरटा पानी पिण्याच्या बाहणाने आत शिरला होता. त्यावेळी हातात पाण्याचा ग्लास घेऊन हॉटेलाच्या गल्ल्याच्या समोर चालत जात बाजूलाच हॉटेल मालकाचा चार्जिंगला लावलेला महागडा मोबाईल हॉटेलमधील मालकासह समोरच बसलेल्या ग्राहकांचीही नजर चुकवून पाणी पिता पिताच मोबाईल पॅन्टच्या खिशात घालून पळ काढला. मात्र मोबाईल चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून हॉटेल चालक कैफ शेख यांनी मोबाईल लंपास केल्या प्रकरणी त्या अनोखळी चोरट्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment