Header AD

गुंदवली ग्राम पंचायतीवर सेनेच्या रोशनी पाटील तर उपसरपंच पदी सुमित म्हात्रे बिनविरोध

भिवंडी ,  प्रतिनिधी  ;  तालुक्यातील २८ ग्राम पंचायतींच्या सरपंच उपसरपंच पदासाठी बुधवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये गोदाम पट्टा व आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या गुंदवली ग्राम पंचायतीवर शिवसेनेच्या रोशनी राजेश पाटील तर उपसरपंचपदी सुमित सुरेश म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे . शिवसेनेचे जैष्ठ कार्यकर्ते सुरेश म्हात्रे बाळ्या मामा यांच्या नेतृत्वाखाली गुंदवली ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत. 


बुधवारी गुंदवली ग्राम पंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता व्ही एस म्हसकर व ग्रामसेवक कैलास पाटील यांच्या उपस्थितीत सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी रोशनी राजेश पाटील तर उपसरपंच पदासाठी सुमित म्हात्रे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी म्हसकर यांनी रोशनी पाटील यांची सरपंचपदी तर सुमित म्हात्रे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड जाहीर केली . रोशनी पाटील व सुमित म्हात्रे यांची सरपंच व उपसरपंच पदी निवड जाहीर होताच त्यांच्या सार्थकांनी फटाके फोडून व गुलाल उधळत एकच जल्लोष केला व गावातून वाजत गाजत भव्य मिरवणूक देखील काढली होती.

 
दरम्यान आमचे नेते माननीय सुरेश म्हात्रे यांनी आमच्यावर जो विश्वास दाखविला आहे त्या विश्वासाला आपण कधीही तडा जाऊ देणार नाही तसेच गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच रोशनी पाटील यांनी दिली आहे. तर गावकऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे आज गावात ग्रामपंचायतीवर सेनेची एकहाती सत्ता आली असून गावच्या विकासासाठी हे सर्व नवनिर्वाचित सदस्य प्रामाणिक प्रयत्न करतील अशी मला आशा आहे त्यांच्या मार्गदर्शनासाठी व मदतीसाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू अशी प्रतिक्रिया सेनेचे जैष्ठ कार्यकर्ते तथा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती सुरेश म्हात्रे बाळ्या मामा यांनी दिली आहे . यावेळी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे यांनी देखील नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
गुंदवली ग्राम पंचायतीवर सेनेच्या रोशनी पाटील तर उपसरपंच पदी सुमित म्हात्रे बिनविरोध गुंदवली ग्राम पंचायतीवर सेनेच्या रोशनी पाटील तर उपसरपंच पदी सुमित म्हात्रे बिनविरोध Reviewed by News1 Marathi on February 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads