विजय नगर प्रभागात गार्डनच्या सुशोभी करणाचा शुभारंभ
◆नगरसेविका शितल मंढारी यांच्या प्रयत्नांना यश विधान परिषद आमदार रविंद्र फाटक यांचा निधी...
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कल्याण पूर्वेतील प्रभाग क्र. ९८ विजय नगर येथे गार्डनच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ करण्यात आला असून शिवसेना नगरसेविका शितल मंढारी यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. या कामासाठी विधान परिषद आमदार रविंद्र फाठक यांचा निधी वापरण्यात येणार आहे.
विजय नगर परिसरात असलेल्या गार्डनची दुरवस्था झाली होती. यामुळे नागरिकांना या गार्डनचा वापर करता येत नव्हता. नागरिकांची हि समस्या लक्षात घेऊन स्थानिक नगरसेविका शितल मंढारी यांनी पाठपुरावा करून विधान परिषद आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडून याकामासाठी निधी आणला आहे. या गार्डनचे सुशोभिकरण होणार असल्याने परिसरातील जेष्ठ नागरिक, महिला, लहान मुलं, नागरिकांना याचा फायदा होणार आहे. यावेळी सुमेध हुमने, प्रशांत बोटे, शंकर पाटील, गंबाजी लाड, उत्तम घाडीगांवकर, कृष्णकांत मोरे, राजेश पेडणेकर आदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Post a Comment