Header AD

शिवसेना उपनेते, माजी आमदार अन् ‘त्रिविक्रमी महापौर’ अनंत तरे यांचं निधन.
ठाणे , प्रतिनिधी  :  शिवसेना उपनेते, ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे (66) यांच आज निधन झालं आहे. गेल्या एक महिन्यांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. आज (सोमवार) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


अनंत तरे हे त्रिविक्रमी महापौर होते. त्यांनी 3 वेळा ठाण्याचे महापौरपद तसेच विधान परिषदेचे सदस्यपद भूषविले होते. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे तरे यांच्यावर महिन्याभरापासून उपचार सुरू होते. आज अखेर त्यांचा मृत्यू झाला. 


महाराष्ट्र कोळी समाज संघ तसेच आई एकविरा देवस्थान ट्रस्टचे (कार्ला) ते अध्यक्ष होते. तरे यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यावर तसेच कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

शिवसेना उपनेते, माजी आमदार अन् ‘त्रिविक्रमी महापौर’ अनंत तरे यांचं निधन. शिवसेना उपनेते, माजी आमदार अन् ‘त्रिविक्रमी महापौर’ अनंत तरे यांचं निधन. Reviewed by News1 Marathi on February 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads