शिवसेनेच्या हळदी कुंकू समारंभाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
◆दिवंगत माजी महापौर कल्याणी पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजन....
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दिवंगत माजी महापौर कल्याण पाटील यांच्या जयंतीनिमित्त कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी येथे महिलांसाठी भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्या तथा विशेष कार्यकारी अधिकारी रेखा शरद पाटील आणि युवासेना पदाधिकारी धनराज पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून महिलांना एक दिवस विरंगुळा मिळावा यासाठी महिलांकरिता खेळ पैठणीचा आणि उखाणे स्पर्धा देखील घेण्यात आली. निवेदक प्रणव भांबुरे यांनी पैठणीचा खेळ आणि उखाणे स्पर्धा उत्कृष्टरीत्या घेतली. या स्पर्धेतील विजेत्या महिलांना सोन्याची नथ, पैठणी, आणि लकी ड्रॉ च्या माध्यमातून आकर्षक १०० बक्षिसे देण्यात आली. यावेळी महिला डॉक्टरांनी उपस्थित महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, मासिक पाळी, गर्भधारणा, इतर अनेक आजार याबाबत स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांनी महिलांना सल्ला दिला.
या कार्यक्रमाला शिवसेना महिला जिल्हा संघटक विजया पोटे, माजी नगरसेविका संगीता गायकवाड, संध्या तरे, रेखा जाधव, शीतल मंढारी, शोभा पावशे, साधना धुमाळ, माजी नगरसेवक शरद पाटील, महादेव रायभोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment