व्ही.जी.एन.ज्वेलर्स वर मनसेचा मोर्चा.. भिशीत गुंतवणूक करणारे ग्राहक सहभाग..
डोंबिवली , शंकर जाधव : व्ही.जी.एन.ज्वेलर्समध्ये चार पाच वर्षांपासून अनेक नागरिकांनी भिशी योजनेत पैसे गुंतवले होते.मात्र ठरलेल्या वेळेत आपली पैसे परत मिळत नसल्याने भिशीत गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांनी ज्वेलर्समध्ये पैसे परत मिळत नसल्याने नागरिकांनी मनसेकडे आपली व्यथा मांडली.मनसेने डोंबिवली पूर्वेकडील टिळकनगर पुतळ्याजवळील व्ही.जी.एन.ज्वेलर्सवर नागरिकांसह मोर्चा काढला.
यावेळी व्ही.जी.एन.ज्वेलर्सच्या मालकाने टप्याटप्प्याने पैसे परत करणार असल्याचे सांगितले.तर मनसेचे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत यांनी नागरिकांना त्यांचे पैसे परत दिले नाहीत तर पुढील आंदोलन मनसे स्टाईलने होईल असे सांगितले. मनसेच्या या मदतीबद्दल उपस्थित नागरिकांनी मनसेचे आभार मानले.

Post a Comment