Header AD

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जुई नगर येथे रोजगार मेळावा संपन्न

 


नवी मुंबई , प्रतिनिधी  :  रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया रोजगार आघाडी नवी मुंबईच्या वतीने छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना महामारी आणि लॉकडाऊन मुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अश्या परिस्थितीत बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 


जुई नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन येथे शेकडो बेरोजगार तरुणांनी उपस्थिती लावली असून यावेळी रिपाई रोजगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत जगताप, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ, युवा जिल्हाध्यक्ष विजय कांबळे, ठाणे लोकसभा अध्यक्ष अँड.यशपाल ओव्होळ, आयटी सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस  सचिन कटारे, वाशी शहर प्रमुख आयुब खान आदींसह अनेक मान्यवर व उमेदवार उपस्थित होते.


रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी रिपाई रोजगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष मल्लिकार्जुन कांबळे, नवीमुंबई रो.आ. अध्यक्ष संदेश उघडे, आश्विन कांबळे यानी परिश्रम घेतले.

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जुई नगर येथे रोजगार मेळावा संपन्न रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जुई नगर येथे रोजगार मेळावा संपन्न Reviewed by News1 Marathi on February 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads