Header AD

नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्‍शन शिवाय औषधे देणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्‍शन शिवाय औषधे देणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.  


कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सध्या रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. महापालिका क्षेत्रातील रुग्णांची त्वरीत चाचणी होवून कोविड बाधित रुग्णांना तातडीने उपचार मिळण्याच्या दृष्टीकोनातून खाजगी वैदयकीय व्यावसायिकांना त्‍यांच्याकडे येणा-या ताप रुग्णांची तातडीने कोविड चाचणी करणेबाबत यापूर्वीच सुचना देण्यात आलेल्या आहेतअसे असतांनाही बरेच रुग्ण हे ताप आल्यास डॉक्टरांच्या सल्‍ल्याशिवाय औषधे घेतात आणि त्यामुळे त्यांना उपचार मिळण्यास विलंब होवून परिणामी अशा रुग्णांची प्रकृती खालावू शकते.


कोरोना साथीला आळा घालण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका अनेकविध उपाययोजना करीत आहेत. महापालिका करीत असलेल्या या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून औषध विक्रेत्यांकडे येणा-या कोणत्याही रुग्णाला डॉक्टरांच्या प्रिस्‍क्रीप्‍शन शिवाय औषधे देण्यात येवू नयेतसेच सदर औषध विक्रेत्यांनी त्यांच्याकडे येणा-या रुग्णांची नोंद, प्रिस्‍क्रीप्‍शन दिलेल्या डॉक्टरांचे नाव व पदनामरुग्णांचे नावपत्ता व संपर्क क्रमांक याची माहिती नजिकच्या नागरी आरोग्य केंद्राला देणेबाबत पत्र कल्याण डोंबिवलीतील सर्व औषध विक्रेत्यांना पाठविले आहे.


सदर पत्राच्या अनुषंगानेसहा. आयुक्तअन्न व औषध प्रशासन यांनी नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्‍शन शिवाय औषधे देणा-या संबंधित किरकोळ औषध विक्रेत्यांविरुध्द कारवाईचा बडगा उगरण्यात येईलअसे त्यांचे पत्रान्वये कळविले आहे.


नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्‍शन शिवाय औषधे देणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्‍शन शिवाय औषधे देणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा Reviewed by News1 Marathi on February 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads