Header AD

कल्याण डोंबिवलीत ७४ नवे रुग्ण, १ मृत्यू

 

◆६०,२१३ एकूण रुग्ण तर ११४० जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ६६ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ७४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून १ जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल आहे. गेल्या २४ तासांत ६६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.           आजच्या या रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६०,२१३ झाली आहे. यामध्ये ७३५ रुग्ण उपचार घेत असून ५८,३३८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ७४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-कल्याण प – ३४डोंबिवली पूर्व – २८डोंबिवली प – , तर  मांडा टिटवाळा  येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 


 

    डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १२ रुग्ण टाटा आमंत्रामधून, २ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल येथून, २ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, तर ५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ७४ नवे रुग्ण, १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत  ७४ नवे रुग्ण, १ मृत्यू   Reviewed by News1 Marathi on February 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महावितरण शेतकऱ्यांच्या बांधावर शहापूर येथील मेळाव्यात ४२ थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान

कल्याण: ०७ मार्च २०२१  :   महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या व  महावितरणकडून अंमलबजावणी सुरु असलेल्या 'कृषिपंप धोरण-२०२०' अंतर्गत चा...

Post AD

home ads