मनसेच्या वतीने `कोविड योद्धा सन्मानपत्र`
डोंबिवली , शंकर जाधव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा आमदार प्रमोद ( राजु ) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डोंबिवली शहर सचिव अरुण जांभळे यांच्या माध्यमातून डोंबिवली शहरातील कोविड १९ मधे कार्यरत असलेल्या रुग्णालयांना आमदार `कोविड योद्धा सन्मानपत्र` देऊन त्यांचा गौरव करण्यात आला व त्यांनी या संकटात जे योगदान दिले याबद्दल त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी डॉक्टर म्हणाले, तुम्ही आमचे मनोबल वाढवता त्यामुळेच आम्हाला असे कार्य करण्याची प्रेरणा मिळते अशी भावना व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष मनोज घरत, शहर संघटक योगेश पाटील, अमित सुलाखे, सुमेधा थत्ते, विभाग अध्यक्ष रमेश यादव, मिलिंद म्हात्रे, श्रद्धा किरवे, उपविभाग अध्यक्ष संदीप म्हात्रे (रमा) , रितेश म्हात्रे, शाखा अध्यक्षा शर्मिला लोंढे, रवी गरुड, सुरज शिंदे, तेजस शेंन्द्रे, सागर मुळे ,रतीकेश गवळी, महाराष्ट्र सैनिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment