Header AD

फास्टटॅग काय लावता आदी रस्ते सुधारा; शिवसेने आमदाराचा क्रेद सरकारला टोला

 भिवंडी दि 16 (प्रतिनिधी )  टोलनाक्यावर  वाहतूक कोंडी आणि त्यामुळे  वाहनचालकांना बसणारा  इंधनाचा आर्थिक फटका यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील  टोलनाक्यावर  वाहनांवर फास्टटॅग लावल्याचे फर्मान काढले. विशेष म्हणजे या फर्मानच्या नियमाचे ज्या वाहनचालकाने  पालन केले नसल्यास त्यांच्याकडून  टोल नाक्यावर  दुप्पट रक्कमेचा  दंड वसूल करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र ठाणे  जिल्ह्यातील  भिवंडी  मतदारसंघात  येणाऱ्या कोन आणि पडघा  टोलनाक्याच्या रस्त्याची  अवस्था बिकट असून आदी रस्ते सुधारा नंतरच काय ते  फास्टटॅग लावा  असा टोला शिवसेनेचे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम  मोरे यांनी केंद्र सरकारला लगावला.

 

फास्टटॅग  योजनेवर बोलतं असतानाच अपघात  ..   


भिवंडी तालुक्यातील मुंबई - नाशिक महामार्गावरील पडघा टोलनाक्यावर  आमदार शांताराम मोरे हे केंद्र सरकारच्या  फास्टटॅग  योजना बाबत त्यांची  भूमिका मांडण्यासाठी पत्रकारांना  मुलाखत देण्यासाठी आले   होते. आमदार मोरे हे  पत्रकारांना माहिती देत असतानाच,  टोलनाक्याच्या ५० ते ७० फूट अंतरावर   त्यांच्याच पाठीमागे या टोलनाक्याच्या मार्गावर पेव्हरब्लॉकचे  पॅच लावल्याने  तरुणीची दुचाकी घसरून ती रस्त्यावरच खाली पडून अपघात झाला.  


त्यात दुचाकीच्या  अपघाताचा  आवाज आल्याने आमदार शांताराम मोरे आणि त्यांचे अंगरक्षक पोलीस, पीए यांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणीच्या दिशेने येणारे भरधाव  वाहने थांबल्याने तिचे प्राण वाचले. त्यांनतर या अपघाताची  घटना पाहून आमदार मोरे यांनी मुंबई - नाशिक  महामार्गावरील  विविध रखडेल्या कामांचा  पाढाच  पञकारां समोर वाचला. तर  प्राण  वाचलेल्या  तरुणीने   आमदाराचे  आभार मानले आहे..

 

फास्टटॅग काय लावता आदी रस्ते सुधारा; शिवसेने आमदाराचा क्रेद सरकारला टोला फास्टटॅग काय लावता आदी रस्ते सुधारा;  शिवसेने आमदाराचा क्रेद सरकारला टोला  Reviewed by News1 Marathi on February 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads