मानसी पाटील, रिया चौधरीच्या शतकांनी दिवस गाजला
ठाणे , प्रतिनिधी : गोल्डन स्टार अकॅडमीच्या मानसी पाटील आणि कर्णधार रिया चौधरीने शतकासह केलेल्या नाबाद द्विशतकी भागीदारीने डॉ राजेश पाटील स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित अर्जुन मढवी स्मृती महिला टी २० क्रिकेट लीग स्पर्धेचा दुसरा दिवस गाजला. स्पोर्टिंग कोल्ट्स संघाविरुद्धच्या सामन्यात मानसीने ६० चेंडूत नाबाद ११७ आणि रियाने ६८ चेंडूत नाबाद १११ धावा करत पहिल्या विकेटसाठी नाबाद २३७ धावांची भागिदारी केली.
मानसीने शतकी खेळीत १८ चौकार आणि १ षटकार ठोकला. तर कर्णधाराला साजेशी फलंदाजी करताना रियाने १६ चौकार आणि १ षटकार मारत शतक पूर्ण केले. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना स्पोर्टिंग कोल्ट्सचा डाव ८० धावांवर आटोपला. त्यांच्या सृष्टी कुडाळकरने सर्वाधिक १८ धावा केल्या. स्पोर्टिंग कोल्ट्सला मर्यादित धावांवर रोखताना सरस्वतीने २१ धावात ३ विकेट्स मिळवल्या. जान्हवी काटेने २७ धावांमध्ये २ आणि उल्का पाटीलने ६ धावांत २ विकेट्स मिळवत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. शतकासह यष्टीपाठी एक झेल पकडणाऱ्या रियाला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मानसी पाटील, रिया चौधरीच्या शतकांनी दिवस गाजला
Reviewed by News1 Marathi
on
February 03, 2021
Rating:

Post a Comment