शहिद भगत सिंग मित्र मंडळाच्या वतीने माघी गणेशोत्सव साजरा..
डोंबिवली , शंकर जाधव : डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकाजवळील शहिद भगतसिंग रोडवरील शहिद भगतसिंग मित्र मंडळाच्यावतीने माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.मंडळाच्या वतीने गेल्या ९ वर्षांपासून माघी साजरा केला जातो.मंडळाचे अध्यक्ष संदीप नाईक, रोहन मोरे,समीर कवडे,अजय घरत,रमेश पाटील,कुणाल ढापरे आदीसह अनेक गणेशभक्त अथक मेहनत घेत असतात. यावेळी अध्यक्ष संदीप नाईक म्हणाले, कोरोना काळात नागरिकांनी नियमांचे पालन करावे आणि लवकरात लवकर जगातून कोरोनाचे संकट दूर व्हावे अशी गणरायाकडे प्रार्थना करतो.
शहिद भगत सिंग मित्र मंडळाच्या वतीने माघी गणेशोत्सव साजरा..
Reviewed by News1 Marathi
on
February 15, 2021
Rating:

Post a Comment