Header AD

ओरिफ्लेमने बेबी केअर उत्पादनांची श्रेणी लॉन्च केली
मुंबई, ४ फेब्रुवारी २०२१ : ओरिफ्लेम या अग्रेसर सोशल सेलिंग स्वीडिश ब्युटी ब्रँडने नैसर्गिक बेबी केअर उत्पादनांची श्रेणी 'बेबी O’ लॉन्च केली आहे. बाळाच्या त्वचेच्या देखभालीकरिता सादर करण्यात आलेल्या या श्रेणीत हेअर व बॉडी वॉश, बेबी ऑइल, बमबम क्लीन्झिंग मिल्क, मल्टी परपज बाम यांचा समावेश आहे. स्किनकेअरमध्ये ब्रँडच्या सखोल ज्ञानावर आधारदित, ओरिफ्लेमे प्रत्येक बेबी O’ उत्पादनाला सुंदर, गोल्डन स्वीडिश ओट ऑइलसह समृद्ध केले आहे. जे केवळ बाळाच्या त्वचेला हायड्रेट करत नाही तर आपल्या बाळाच्या त्वचेला बाह्य संसर्गापासून वाचवण्यासाठी मजबूत भिंतही तयार करते. जागतिक पातळीवरील मान्यताप्राप्त स्किन हेल्थ अलायन्सच्या नामांकित बालरोगतज्ञांनी प्रत्येक उत्पादनाच्या फॉर्मुलेशनला समर्थन दिले आहे.


आनंददायी अंघोळीसाठी बेबी O’ ने टीअर फ्री, सौम्य क्लिन्झिंग व कंडिशनिंग जेल आणले असून ते संपूर्ण शरीरासाठी वापरता येते. हा सौम्य, फेस होणारा फॉर्म्युला तुमच्या बाळाचे नाजूक केस व त्वचा मऊ, आरामदायी आणि सुरक्षित ठेवते. सुखदायक बेबी O’ ऑइल हे बाळाची मौल्यवान त्वचेचे पोषण व संरक्षण करण्यासाठी तयार केलेले एक केअरिंग तेल आहे. गोल्डन स्वीडिश ओट ऑइल व सीड ऑइल कॉम्प्लेक्स वापरून तयार केलेले हे सर्वत वेगळे तेल त्वचेतील अडथळे दूर करून त्वचा भरून काढते व ती मजबूत करते. बेबी O’ मल्टीपर्पज बाम हा बाळाच्या संवेदनशील त्वचेला शांत व आतपर्यंत पोषक ठरतो. स्वीडिश ओट तेलामुळे, बाम आर्द्रता टिकवून ठेवण्यास त्वचेला मजबूत बनवते.

ओरिफ्लेमने बेबी केअर उत्पादनांची श्रेणी लॉन्च केली ओरिफ्लेमने बेबी केअर उत्पादनांची श्रेणी लॉन्च केली Reviewed by News1 Marathi on February 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads