Header AD

मूर्तिकार - कलावंतांच्या सिरॅमिक कला शिबिरांचे उद्घाटन

 

◆मूर्तीकरांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध - माजी आमदार नरेंद्र पवार...


कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पश्चिम येथे श्री गणेश मूर्तिकार सेवा संस्थेच्या माध्यमातून व केंद्रीय वस्त्रौद्योग मंत्रालयाच्या सौजन्याने आयोजित मूर्तिकार-कलावंतांसाठी ५० दिवसांच्या सिरॅमिक कला शिबीराचे उद्घाटन माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांच्याहस्ते करण्यात आले.


मूर्तिकार आणि कलावंत हे समाजातील महत्वाचे घटक आहेतमूर्तिकारांनी गेली शेकडो वर्षे आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम केले. मूर्तिकार एखादी मूर्ती घडवत असतो तेव्हा ती मूर्ती समाजाला चिरकाल दिशा आणि प्रेरणा देत असतेकलावंतही आपल्या कलेच्या माध्यमातून उल्लेखनीय काम करत असतात. केवळ आनंद आणि हास्य फुलवण्याचेच काम नाही तर समाजाच्या दुःखावर फुंकर घालण्याचे काम कलाकार करत असतात. शासनाने पी.ओ.पी. च्या मूर्तीवर बंदी आणली आहेहे योग्यच असूनआपली मूर्तीकार संघटना त्याचे स्वागत करत आहे कौतुकास्पद आहेछोटे छोटे कलाकार आणि मूर्तिकार यांना त्याचा फायदा होणार असल्याचे मत माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले.


यावेळी वस्त्रोद्योग मंत्रालयसहाय्यक संचालक भारत सरकार पल्लवी जांभूळकरज्युनिअर एक्सपोर्ट प्रमोशन ऑफिसर कृष्णा चंदरश्रीगणेश मूर्तिकार सेवा संस्थेचे अध्यक्ष नरेश चव्हाणसरचिटणीस हेमंत ईश्वादखजिनदार सुनिल गिरकरगणेश हनमुखे आदी मूर्तिकार-कलावंतपदाधिकारी नागरिक उपस्थित होते.


मूर्तिकार - कलावंतांच्या सिरॅमिक कला शिबिरांचे उद्घाटन मूर्तिकार - कलावंतांच्या सिरॅमिक कला शिबिरांचे उद्घाटन Reviewed by News1 Marathi on February 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads