Header AD

खुन करुन दोन वर्ष लपून राहिलेल्या आरोपीस भिवंडीत अटक

 
भिवंडी ,  प्रतिनिधी  :  यवतमाळ मध्ये हत्या करुन फरार होऊन कल्याण येथे सर्विस सेंटर वर काम करीत स्वतःचे अस्तित्व लपवुन राहिलेल्या आरोपीस भिवंडी गुन्हे शाखेने अटक केली आहे .विरेंद्र कोल्हे ,वय ३१ रा.पाटीपुरा, यवतमाळ असे आरोपीचे नाव असून विशेष म्हणजे  त्या वर एकुण चार हत्येचे गुन्हे नोंद आहेत.


या बाबत माहीती अशी की भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ  पोलीस निरीक्षक  अशोक होनमाने यांच्या पथकास यवतमाळ येथील एक हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी स्वतःचे अस्तित्व लपवुन कल्याण येथे वास्तव्य करीत असल्याची माहीती गुप्त बातमीदारा मार्फत मिळाल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव ,पो उप निरी शरद बरकडे,सपोउप निरी रामसिंग चव्हाण,कर्मचारी अरुण पाटील,सुधाकर चौधरी,साविर शेख,वसंत गवारे,भावेश घरत या पथकाने कल्याण येथील चक्की नाका परीसर लोकग्राम येथील एका सर्विस सेंटर वर दुचाकी धुवत असताना त्या वर्णनाचा व्यक्ती आढळून आला असता त्यास ताब्यात घेत भिवंडी गुन्हे शाखेत आणुन करुन चौकशी केली असता विरेंद्र कोल्हे याने आपल्या साथीदारा सोबत २०१९ मध्ये यवतमाळ येथे एक हत्या केल्याचे कबुल केले .व तपासात  या गुन्हेगाराने २०१४,२०१५,२०१८ मध्ये हत्या केली असल्याचे कबुल केले असुन २०१८ मध्ये न्यायालयातून  जामिनावर मिळविल्या पासुन तो फरार झाला होता .
खुन करुन दोन वर्ष लपून राहिलेल्या आरोपीस भिवंडीत अटक खुन करुन दोन वर्ष लपून राहिलेल्या आरोपीस भिवंडीत अटक Reviewed by News1 Marathi on February 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads