Header AD

लहान मुलींवर अत्याचार करणार्‍यांचा एन्काऊंटर करा बाल अत्याचारा विरोधात रिपाइं एकतावादीची निदर्शने
ठाणे , प्रतिनिधी  :  राज्यात अनेक ठिकाणी लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशा नराधमांना वचन बसवायचा असेल तर चिमुरड्यांवर अत्याचार करणार्‍यांचा आंध्र प्रदेशच्या धर्तीवर एन्काऊंटर करावा, या मागणीसाठी रिपाइं एकतावादीच्या वतीने ठाण्यात निदर्शने करण्यात आली. 


सध्या लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढू लागल्या आहेत.  पेण येथील आदिवासी मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर काही दिवसातच नांदेड जिल्ह्यातील  भोकर तालुक्याच्या दिवशी या गावात एका पाच वर्षीय आदिवासी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ रिपाइं एकतावादीचे युवक प्रदेशाध्यक्ष भैय्यासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. 


यावेळी राज्य सरकारच्या महिला धोरणाविरोधात तसेच शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी, यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


या प्रसंगी भैय्यासाहेब इंदिसे यांनी सांगितले की,   पेण येथील घटनेत लोकांचा उद्रेक झाल्याने हा खटला जलदगती न्यायालयात वर्ग करण्यात आला असून विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे.  हाच निकष नांदेड मधील घटनेबाबत लावण्यात आलेला नाही.  तरी , दोन्ही घटना मानवतेला काळीमा फासणार्या असल्याने पेणप्रमाणेच नांदेड येथील अत्याचार प्रकरणी खटला जलदगती न्यायालयात चालवून शक्ती कायद्यानुसार  बाबू सांगेराव या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी; त्याही पुढे जाऊन लहान मुलींवर अत्याचार करणार्‍यांचा एन्काऊंटरच करावा; जेणेकरुन अशा नराधमांना वचक बसेल, अशी मागणी केली. 


या आंदोलनात रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय सरचिटणीस उत्तमराव खडसे, रवी वंजारे, सुनील सदावर्ते, राजन गिरप, शनिल देढे,  विकी रामराजे, शेखर रामराजे, किसन पाईकराव,भगवान कर्‍हाळे, संदीप शेळके, गौतम कांबळे, अमोल पाइकराव, रवी डोंगरे, गजानन टारपे, कैलास बरडे, विजय वाहुळे, अरुण हाटकर, मिलींद पाईकराव, राजू चौरे, हरीष यादव, राकेश राजभर, रमेश बरडे, बबन कांबळे, नागसेन हरणे, संतोष धोंगडे, प्रविण पाइकराव, शिवाजी वाघमारे, अनिल आठवले, अविनाश नरवाडे, प्यारेलाल भाऊ, भीमराव मनोहर  आदी सहभागी झाले होते.

लहान मुलींवर अत्याचार करणार्‍यांचा एन्काऊंटर करा बाल अत्याचारा विरोधात रिपाइं एकतावादीची निदर्शने लहान मुलींवर अत्याचार करणार्‍यांचा एन्काऊंटर करा बाल अत्याचारा विरोधात रिपाइं एकतावादीची निदर्शने Reviewed by News1 Marathi on February 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads