Header AD

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने डोंबिवली येथे पोलिसांना बॅरिकेडसचे वाटपडोंबिवली , प्रतिनिधी  :  डोंबिवली विभागामध्ये वाढणारी वाहनांची गर्दी व त्यामुळे होणारी गैरसोय ओळखून वाहतूक नियंत्रणाकरिता डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ने 60 बॅरिकेटस देऊन पोलीस विभागाला अतिशय मोलाचे सहकार्य केले आहे महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांनी दिलेली शिकवण आहे की देशाने आपल्याला काय दिले हे महत्त्वाचे नाही आपण देशाला काय देतो हे महत्वाचे आहे आणि याच शिकवणीनुसार कार्य करीत असताना पद्मश्री डॉ. श्री दत्तात्रेय  नारायण कथा आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण श्री. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे हे 60 बॅरिकेटस सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. जे. डी. मोरे यांच्या उपस्थितीत पोलीस विभागाकडे सुपूर्त करण्यात आले.


कार्यक्रमाच्या वेळी श्री. जे. डी. मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू केलेल्या बैठकीच्या माध्यमातून वाईट वळणाकडे गेलेल्या अनेक व्यक्तींना सदमार्गाकडे वळवण्याचे कार्य केले जाते रायगड, रत्नागिरी, ठाणे जिल्ह्यामध्ये आपण सर्व हे पाहिल्याचे सांगितले प्रतिष्ठानने उपलब्ध करून दिलेले 60 बॅरिकेट्स आम्हाला ट्राफिक नियंत्रण, व्हीआयपी बंदोबस्त, मोर्चे, आंदोलने, नाकाबंदी इत्यादी कामासाठी अतिशय उपयुक्त ठरतील त्यानी प्रतिष्ठान'तर्फे धारावी मुंबई येथे झालेल्या स्वच्छता अभियानाचे विशेष कौतुक केले यावेळी श्री. डी. एच. चौरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानपाडा पोलीस स्टेशन) श्री. अभय धुरी (वरिष्ठ पोलीस निरीक्षक टिळक नगर पोलीस स्टेशन) श्री. एस. एस. साबळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णुनगर पोलीस स्टेशन) श्रीमती. राजश्री शिंदे (सहाय्यक पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा डोंबिवली विभाग) श्री. आर. बी. पाटील (सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक) व त्यांचे सहकारी उपस्थित होते

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने डोंबिवली येथे पोलिसांना बॅरिकेडसचे वाटप डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने डोंबिवली येथे पोलिसांना बॅरिकेडसचे वाटप Reviewed by News1 Marathi on January 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads