गणेशपुरी येथे गरम पाण्याची कुंड उघडण्याचे आदेश देउन ही बंदच
भिवंडी , प्रतिनिधी : भिवंडी तालुक्यातील श्री क्षेत्र गणेशपुरी नित्यानंद बाबा ची पवित्र कूंड ही कोरोनाच्या प्रादुर्भाव मूळे आठ महीने बंद होती. मात्र काल ता २८ रोजी येथील भीमेश्वर सदगुरु नित्यानंद संस्थान चे चेअरमन रामचंद्र शेनॉय यांनी सदर कुंड उघडण्या चे लेखीआदेश देऊनही येथील व्यवस्थापीका यांच्या मनमानी मुळे अद्याप बंद असल्याने गणेशपुरी ग्रामस्थ व भक्तगणां मध्ये संताप व्यक्त केला जात आहे .
गेल्या काही महिने कोरोना या महामारी मुळे येथील सुपरिचित अशा स्वामी नित्यानंद महाराज समाधी मंदिर परिसातील गरम पाण्याचे कुंडे हे बंद करण्यात आले तबल आठमहिन्या नतंर महाराष्ट्र राज्य -मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दीपावली पाडव्यानतंर सर्व व्यवहार सूरू करण्याचा आदेश दिला. परंतु श्री क्षेत्र गणेशपुरी मधील नेहमी प्रमाणे श्री नित्यानंद बाबाची पवित्र कूंड ही बंद च आहेत तसेच पूर्ण मंदिर परिसरात बॅरिकेटर लावून देऊळ बंदिस्त केले आहे .
काल ता २८ रोजी श्री भीमेश्वर सद्गगुरु नित्यानंद संस्था चे चेअरमन रामचंद्र शेनॉय, स्थानिक विश्वास्त मुरलीधर हेगडे यांनी स्वता लेखी निवेदन देऊन देखील येथील व्यवस्थापीका अपर्णा पाटील यांच्या मनमानी मुळे कुंडे आद्यप उघडली जात नसल्याने येथील ग्रामस्थ व भाविकांच्या भावना दुखावल्या जात असल्याने परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून सदर व्यवस्थापिका अपर्णा पाटील यांच्या वर कारवाई करावी अशी मागणी होत आहे .
गणेशपुरी येथे गरम पाण्याची कुंड उघडण्याचे आदेश देउन ही बंदच
Reviewed by News1 Marathi
on
January 29, 2021
Rating:

Post a Comment