Header AD

दिवंगत आकाश जाधव यांच्या मारेकऱ्यांना त्वरीत अटक करून कठोर शिक्षा करा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि. ३ :  -  सांताक्रूझ पूर्वेतील वाकोला येथे राहणारे बौद्ध युवक आकाश जाधव यांची स्थानिक आरोपींनी पाण्यावरून झालेल्या भांडणामुळे जबर मारहाण केली. त्यात उपचार सुरू असताना कुपर रुग्णालयात त्याचे निधन झाले.त्याच्या निधनाच्या धक्क्याने त्यांच्या वडिलांचे जयराम जाधव यांचे ही निधन झाले. त्या जाधव परिवाराची  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी आज सांत्वनपर भेट घेतली. दिवंगत आकाश जाधव (वय 23) या युवकाच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या 6 आरोपी मारेकऱ्यांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली आहे.दिवंगत आकाश जाधव यांच्या हत्ये प्रकरणी कलम 302 आणि ऍट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून ऍट्रोसिटी कायद्यानुसार दिवंगत आकाश जाधव च्या कुटुंबियांना शासनातर्फे  कायदेशीर मदत आणि 8 लाख 25 हजाराची आर्थिक मदत सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनातर्फे मिळवून देऊ तसेच आकाश जाधव यांच्या  बहिणीला शासकीय नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून तसेच या जाधव परिवाराला जल जोडणी नसल्यामुळे त्यांना त्वरित महापालिकेतर्फे जलजोडणी मिळवून देण्याचे आश्वासन देत रिपाइं तर्फे 50 हजाराची सांत्वनपर मदत देणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी जाहीर केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे;कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड सुधीर मोरे;रिपाइं जिल्हा अध्यक्ष विवेक पवार; सिद्धार्थ कासारे; तालुका अध्यक्ष रघुनाथ कांबळे: अमित तांबे; सचिन कासारे ; दीपक पवार आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
दिवंगत आकाश जाधव यांच्या मारेकऱ्यांना त्वरीत अटक करून कठोर शिक्षा करा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले दिवंगत आकाश जाधव यांच्या मारेकऱ्यांना त्वरीत अटक करून  कठोर शिक्षा करा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले Reviewed by News1 Marathi on January 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads