Header AD

२कोटी रुपयांच्या बेडशिट ऐवजी विदेशात पाठवली दगडी हेराफेरी करणारी चौकडी अटक


 भिवंडी(प्रतिनिधी)भिवंडीतून विदेशात जाणाऱ्या सुमारे  कोटी रुपयांच्यावर बेडशीट  चोरीचा नारपोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहेविशेष म्हणजे कंटेनरच्या साह्याने भिवंडीतून  न्हावाशेवा पोर्ट बंदर पर्यत सीलबंद असलेल्या बेडशीटचे बॉक्स  जलवाहतूक मार्गाने विदेशात पाठिण्यात येत होतेमात्र भिवंडी ते  न्हावाशेवा पोर्ट दरम्यानच चोरटे कंटेनरमधून  बेडशीटचे बॉक्सकाढून त्याबॉक्स मध्ये तेवढ्याच वजानेचे दगडी भरून  विदेशात पाठवीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.याप्रकरणी चार आरोपींना नारपोली पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या पैकी  कोटी ९२ लाखांहून अधिक बेडशिटचे बॉक्स हस्तगत करण्यात आल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपाआयुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहेसर्फराज मोहम्मद युनूस अन्सारी, (वय ४५रा.गोवंडी मुंबई )  मोहम्मद फारूक मोहम्मद यासीन कुरेशी, (वय ४६ रा.  गोवंडी मुंबई)  मोहम्मद रिहान मोहम्मद नबी कुरेशी, (वय २९,  रामुरादाबाद,  उत्तरप्रदेश.  मोहम्मद मुल्तजीम मोहम्मद हजिम कुरेशी(वय ३०मुरादाबाद,  उत्तरप्रदेशअसे अटक केलेल्या आरोपींचे नावे असून चौघेही उत्तरप्रदशचे रहिवासी असून ते गुन्हा करून  मूळगावी पळून गेले होतेमात्र पोलिसांना आरोपींचे  मोबाईल लोकेशन  वाहनांतील जीपीएस सिस्टमच्या मदतीने आरोपीपर्यत पोहचण्यास मदत झाली आहे


 

विदेशात बेडशीटचे बॉक्स पोहचल्यानंतर उघडकीस आला प्रकार..यंत्रमाग नगरी म्हणून भिवंडी शहराची ओळख असून येथून कपडा उद्योगात तयार होणाऱ्या विविध कपड्यांना विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहेअश्याच एका विदेशी कंपनीने भिवंडीतील  काल्हेर भागात असलेल्या भरत श्याम मेहरोत्रा सचिन सज्जन झुनझुनवाला या दोन यंत्रमाग कंपनीच्या मालकांना    कोटी रुपयांच्यावर विदेशातील एका कंपनीने  बेडशीटची ऑर्डर दिली होतीत्याप्रमाणे यंत्रमाग मालकाने बेडशीट तयार करून पॅकिंग करीत ट्रेलरद्वारे सिलबंद कंटेनरमध्ये  ते न्हावाशेवा पोर्ट बंदर येथे पाठवीत होतेत्यामध्ये   कोटी २६ लाख ९९ हजार ,८०९ रुपयांच्या बेडशीट बॉक्स २० ऑक्टोंबर २०२० रोजी  सिलबंद कंटेनरमध्ये तर अश्याच पद्धतीने १० नोव्हेंबर २०२० रोजी   कोटी १५,लाख रुपयांच्या बेडशीटचे बॉक्स  भिवंडीहुन  न्हावाशेवा पोर्टला रवाना केले होतेविशेष म्हणजे सदरच्या बेडशीटचे बॉक्स विदेशात आठ दिवसानंतर ऑर्डर देणाऱ्या कंपनीत पोहचले त्यावेळी बॉक्समध्ये बेडशीट ऐवजी दगडी भरलेले आढळून आले होतेत्यामुळे तेथील कंपन्यांच्या मालकाने  भिवंडीतील बेडशीट तयार करणाऱ्या कंपनीच्या दोन्ही मालकांना हि गंभीर बाब निदर्शनास आणून दिली होतीत्यांनतर दोन्ही मालकांनी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी चोरट्याचा तपास सुरु केला होता 

 चोरीच्या सहभागात कंटेनर चालक पण ..  


दोन्ही  कंटेनर चालक  त्यांचे इतर दोन आरोपी असलेले हे एकमेकांचे नातेवाईक असून सर्वच उत्तरप्रदेशमधील आसपासच्या गावात राहणारे आहेगुन्हा आपला उघडकीस येईल या भीतीने त्यांनी  बेडशीटचे बॉक्स वसई मध्ये तर काही मूळगावी गोदामात लपून ठेवले होतेमात्र पोलिसांनी शिताफीने तपास करून या चारही आरोपीना अटक केली आहे.  विशेष म्हणजे जगभरात सुरु असलेल्या कोरोना आजारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामात परदेशात माल निर्यात करणारे भारतीय व्यापाऱ्यांची मलीन झालेली प्रतिमा उंचावुन सदर दोन्ही  गुन्हे उघडकीस आणुन एकुण  कोटी  ९२ लाख ,८७० रुपयांचा  बेडशिटचा माल हस्तगत करण्यात आला आहेसद्या आरोपी पोलीस कोठडीत असुन त्यांनी अशा प्रकारचे इतर गुन्हे केले असल्याची माहिती मिळत असुन त्यांचेकडून इतर गुन्हे देखील उघड होण्याची शक्यता असल्याची माहिती  पोलीस उपायुक्त  योगेश चव्हाण यांनी दिली आहे.  

२कोटी रुपयांच्या बेडशिट ऐवजी विदेशात पाठवली दगडी हेराफेरी करणारी चौकडी अटक २कोटी रुपयांच्या  बेडशिट ऐवजी विदेशात पाठवली दगडी हेराफेरी करणारी चौकडी अटक Reviewed by News1 Marathi on January 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads