घंटागाडी ठेकेदारांचे काम बंद आंदोलन मुले भिवंडीत स्वच्छता अभियानाचा बोजवारा
भिवंडी , प्रतिनिधी : भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतानाच शहरातील कचरा संकलन करणाऱ्या ९० घंटागाडी ठेकेदारांच्या कामाचे पैसे महानगरपालिका प्रशासन देत नसल्याने शहरातील कचरा उचलणे बंद केल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरल्याने स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे.
भिवंडी शहरातील ९० वार्डातील कचरा संकलनाची जबाबदारी खगी ठेकेदारांच्या घंटागाड्यांवर सोपविण्यात आली असून या ठेकेदारांना मागील एक वर्षां पासून मासिक पैसे देण्याबाबत नियमित टाळाटाळ केली जात असल्याने पाच ते सहा महिन्यांची पैसे ठेकेदारांचे मिळणे बाकी असताना महानगरपालिका प्रशासन पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने सोमवारी या सर्व ठेकेदारांनी कचरा उचलण्याचे काम बंद केले .या अचानक काम बंद आंदोलना मुळे भिवंडी शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असल्याने स्वच्छ भारत अभियान काळातच नागरीकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे .
घंटागाडी ठेकेदारांचे काम बंद आंदोलन मुले भिवंडीत स्वच्छता अभियानाचा बोजवारा
Reviewed by News1 Marathi
on
January 11, 2021
Rating:

Post a Comment