भीषण आगीत गादीचे दुकान जळून खाक
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण पूर्वेतील एका गादीच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली असून संपूर्ण दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. हि घटना कल्याण – मलंगगड मार्गावरील असलेल्या चेतना नाका येथे एका इमारतीत असलेल्या गादी विक्रीच्या दुकानात घडली आहे. आगीची तीव्र एवढी होता कि, लगतच्या दुकानांना त्याची झळ बसली आहे.
कल्याण पूर्वेतील चेतना नाका परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये गॅलेक्सी नावाचे गादी विक्रीचे दुकान आहे. आज दुपारच्या सुमाराला अचानक दुकानात आगीचा भडका उडाला. हे पाहताच दुकानातील मालक व कामगाराने बाहेर पळ काढला. त्यामुळे या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र कपडे, कापूस मोठ्या प्रमाणात दुकानात असल्याने कापसाने पेट घेतल्याने आगीचे आगीचे रूपांतर भीषण आगीत झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर अर्ध्यातासाच नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यत दुकानातील गादी व इतर साहित्य जळून खाक झाले. तर या आगीचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाराने सांगितले. दुसरीकडे या घटनेमुळे परिसरात लागूनच असलेल्या दुकानदारांसह इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Post a Comment