मतांपेक्षा पुढे जाऊन भटक्यांना आधार द्या भटके विमुक्त भाजपा मोर्चा प्रदेश संयोजक नरेंद्र पवार
कल्याण , कुणाल म्हात्रे : आपण जितक्या लोकांना संपर्क करू, तितका पक्ष मोठा होतो. समाजातील अंतिम माणूस हा भटक्या विमुक्त समाजातील आहे. सर्व समाजाच्या पाठीशी भाजपा उभी असते व आहे. या समाजाला संघटित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. मतांपेक्षा पुढे जाऊन भटक्यांना आधार द्या, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेश संयोजक माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले. ते भारतीय जनतापार्टी चंद्रपुर जिल्हा महानगर, भटके विमुक्त मोर्चाच्या आढावा बैठकीत आमदार सुधीर मुनगंटीवार जनसंपर्क कार्यालय येथे मुख्य मार्गदर्शन करतांना शनिवारी बोलत होते.
यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, महामंत्री राजेंद्र गांधी, सुभाष कासंगोट्टूवार, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, भटके विमुक्त मोर्चा जिल्हाध्यक्ष(श,) दिवाकर पुद्दटवार, डॉ देवेंद्र अहेर, प्रशांत विघ्नेश्वर यांची उपस्थिती मंचावर होती.
भटके विमुक्त समाज इतर समाजापेक्षा गरीब समाज आहे. भटके असल्यामुळे जात प्रमाणपत्र व त्याची वैधता यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही सर्वात मोठी समस्या या समाजापुढे आहे. या समाजात ४९ जातींचा समावेश आहे. त्याचे एकत्रीकरण करून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी पवार यांनी विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांची सदिच्छा भेट घेतली.

Post a Comment