Header AD

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई ,  दि , ३  :  औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्याचा काही लोक अट्टाहास करीत आहेत. मात्र कोरोना च्या  पार्श्वभूमीवर असे वाद शासनाने बाजूला ठेवावेत.आता औरंगाबाद चे नाव बदलू नये.औरंगाबाद चे नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध असून महाविकास आघाडी सरकार ने औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय घेऊ नये असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे. 


सध्या औरंगाबाद च्या नामांतराचा वाद सुरू आहे. कोरोना च्या या काळात जनता  खडतर दिवसांना सामोरी जात असताना  राज्याच्या विकासाचे विधायक मुद्दे बाजूला ठेऊन नामांतराचा मुद्दा राज्य सरकारने पुढे आणू नये. नामांतराच्या आंदोलनाची आम्ही 17 धग भोगली आहे. त्यामुळे औरंगाबद चे आता नामांतर करू नये. औरंगाबाद च्या नामांतरास रिपब्लिकन पक्षाचा  विरोध राहील असे ना रामदास आठवले यांनी आज स्पष्ट केले.


छत्रपती संभाजी महाराजांना  आम्ही आदर्श मानणारे आहोत.मात्र संभाजी महाराजांच्या नावाचा कोणी राजकारणासाठी वापर करू नये.असे मत ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले Reviewed by News1 Marathi on January 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पार्टीला घवघवीत यश-१४३ ग्राम पंचातीमधुन १२३ सदस्यांची बहुमताने निवड

भिवंडी ,  प्रतिनिधी   :  संपुर्ण ठाणे जिल्ह्यात १५८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या होत्या त्यापैकी १५ ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध ठरल...

Post AD

home ads