Header AD

टिटवाळ्यात माणुसकीची भिंतच्या माध्यमातून गोर गरीब गरंजुना आधार




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली मनपाच्या घनकचरा विभागाच्या माध्यमातून माणुसकीची भिंत संकल्पनेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. यातुन गोर गरीब गरंजुना वस्त्रांची मुलभुत गरज भागत असल्याने समाजातील अर्थिक दुर्बल घटकांला मोठा दिलासा मिळत आहे. "अ" प्रभाग क्षेत्रातील टिटवाळा महागणपती पार्किंग लगत उभारलेल्या माणूसकीच्या भिंतीचे रविवारी सकाळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे घ.क.व्य. उपआयुक्त रामदास कोकरे, "अ" प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकलमुख्य आरोग्य निरिक्षक राजेश गवाणकर,  क.डो.मपा स्वच्छता दुत प्रमोद नादंगावकर राज्य जनसंपर्क संचालक रेड स्वस्तिक सोसायटी, महाराष्ट्र राज्य प्रकाश कुलकर्णी  यांचे प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.


संकलित झालेले कपडेखेळणीलहान मुलांची पादत्राणे लगेचच उपस्थित गरजू, गरीब व्यक्तींना देण्यात आली. यानिमित्ताने गोर गरीब आदिवासी महिला तसेच बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. महानगरपालिका क्षेत्रातील गोर गरीब नागरिकांना मदत करण्यासाठी महापालिकेच्या दहाही प्रभागात १० माणूसकीच्या भिंती उभारण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.


  जे आपल्यासाठी निरउपयोगी आहे ते एखाद्या गरजवंताला उपयोगी पडु शकते व त्यांची गरज पूर्ण होऊ शकते. तसेच दान सतपात्री लागू शकते या संक्लपनेतुन माणुसकीची भिंत उभारत आहोत. शुन्य कचरा मोहिमेस नागरिकांनी प्रतिसाद देत आपल्या शहराची स्वच्छेतेकडे वाटचाल करीत शहर स्वच्छ मोहीम सुरू राहिली पाहिजे.  या संकलित होणाऱ्या कापड्यामधुन महिला  बचत गटांच्या रोजगाराला प्राध्यान देत कापडी पिशव्या महिला बचतगटामार्फत शिवून नाममात्र दरात  विक्री करून प्लास्टिक पिशव्या बंदीला व्यापक अमंलबजावणी करण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे घकव्य उपआयुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले.

टिटवाळ्यात माणुसकीची भिंतच्या माध्यमातून गोर गरीब गरंजुना आधार टिटवाळ्यात माणुसकीची भिंतच्या माध्यमातून गोर गरीब गरंजुना आधार Reviewed by News1 Marathi on January 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads