आरएसपी अधिकारी युनिटच्या सहकार्याने आदिवासी पाड्यात संक्रांत साजरी
कल्याण , प्रतिनिधी : सपी कल्याण डोंबिवली शिक्षक युनिटच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुक्यातील आंबिवली- पूर्व येथील कातकरी -आदिवासी पाड्यात सिंध एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी प्राचार्या रेखा ठाकूर, कॅप्टन ओक हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मेधा कुलकर्णी, सन २०२० चा मिस इंडिया पुरस्कार विजेती गजनंदिनी गिरासे, स्वामी नारायण हॉल कमिटी संचालक दिनेश ठक्कर, रोटी डे ग्रुप, सोहम फाउंडेशन, अमृत विला ट्रस्ट, सोहम फाऊंडेशन, जीवन आशा फाऊंडेशन, आधार एक- हात मदतीचा, केशरी मित्रमंडळ, गायत्री मॅडम यांच्यातर्फे आरएसपी युनिट कमांडर मनिलाल शिंपी यांच्या पुढाकाराने मकरसंक्रांत निमित्त २०० साड्या व ब्लॅंकेट आणि ६०० लोकांना संक्रांत निमित्त तिळगुळ व भोजन देण्यात आले.
ओक हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मेधा कुलकर्णी यांनी या उपक्रमाबद्दल आरएसपी युनिटचे अभिनंदन केले. सिंध एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी प्राचार्या रेखा ठाकूर यांनी सांगितले की, "आज खऱ्या अर्थाने आरएसपी युनिटचे महत्व समजले, की या युनिटच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समाजसेवा करण्याची संधी उपलब्ध झाली, यापुढे आमच्या संस्थेतर्फे होणारे प्रत्येक प्रोग्राम आरएसपी युनिट मार्गदर्शनाखाली केले जातील, आरएसपी युनिटच्या कामगिरीला सलाम असे उदगार काढले.
गायत्री मॅडम यांनी महिला वर्गाचे संक्रांत निमित्त तिळगुळ देऊन स्वागत केले. मिस इंडिया पुरस्कार विजेती गजनंदिनी गिरासे यांनी सांगितले की "मलाही अश्या गरीब वस्तीतील मुलींना मोफत शिक्षणासाठी मदत करण्यासाठी आवडेल असे आश्वासन दिले. यावेळी आरएसपी अधिकारी युनिटचे आर आर भोकनळ, रेखा प्रभू, बंशीलाल महाजन, योगेश अहिरे, नितीन पाटील, रितेश पाटील, बापू शिंपी, दत्तात्रय सोनवणे, ऋषांत धामापुरकर, शेळके, दत्तात्रय पाटील, दिलीप पावरा, तुषार बोरसे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजानन पाटील, बी जी टिळक हायस्कूलच्या प्रिन्सिपॉल मुस्कान मॅडम, जयश्री मॅडम, मुकेश बदलानी, नटवर वर्मा, मुकेश टेलर, निलेश ठोंबे, सुनीता विश्वे, मिलिंद कळदकर, समाजसेवक सुरेश धडके आणि प्रभाशंकर शुक्ला यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनंत कीनगे यांनी केले.

Post a Comment