Header AD

कोपरी पुलाची गर्डर बसविण्या साठी यंत्रणा सज्ज - खासदार राजन विचारे
ठाणे,  प्रतिनिधी :- हायवे पूर्वदृती महामार्गावरीलअरूंद कोपरीपुलामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतुन सुटका मिळवण्यासाठी महत्वकांक्षी असलेला कोपरीरेल्वे पुलाचे  काम अंतिम टप्प्यात आजरात्री पासून सुरू होणार आहे सदर कामासाठी लागणारी यंत्रणांची नियोजन व्यवस्था बघण्यासाठी आज खासदार राजन विचारे यांनी महापौर नरेश म्हस्के ,वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील ,एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता प्रकाश भांगरे रेल्वेचे प्रकल्प व्यवस्थापक  श्री लोलगे यांच्या समवेत पाहणी केली त्यावेळी स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे,नगरसेविका मीनल संखे, नम्रता फाटक ,मालती भोईर, नम्रता पमनानी, शर्मिला पिंपळगावकर माजी नगरसेवक गिरीश राजे शिवसैनिक रोहित गायकवाड रमाकांत पाटील व इतर सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार राजन विचारे यांच्याकडून माहिती देत असताना त्यांनी हायवे पूर्व दृती महामार्गावरील 1958 साली बांधलेला हा रेल्वे पुलाला 63 वर्षे पूर्ण झाली होती.


1995 नंतर पूर्व दुती महामार्गावरील रेल्वे पूल सोडून दोन्हीबाजूस 8 मार्गिका करण्यात आल्या होत्या परंतु सदरचा पूल चारमार्गिका असल्याने गर्दीच्या वेळी या पुलामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत होता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवीन पुलासाठी प्रस्ताव बनविण्यात आला होता परंतु निधीअभावी हे काम रखडले होते खासदार राजन विचारे या पुलाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी एम एम आर डी चे आयुक्त युपीएस मदान यांच्याकडे  सन २०१५ पासून पाठपुरावा सुरू केला त्यासाठी मुख्यमंत्र्यांची ही भेटघेतली त्यानंतर दिनांक 19 ऑक्टोंबर 2016रोजी 258 कोटी ची मान्यता मिळाली सदर कामाची पुन्हा पाहणी करून खासदार राजन विचारे यांनी या प्रकल्पामध्ये 4+4 लेन करून शेजारी होणाऱ्या नवीन रेल्वे स्थानकातील वाहतुक कोंडी होऊ नये या दृष्टिकोनातून ज्ञानसाधना ते भास्कर कॉलनी या ठिकाणी भुयारीमार्ग तसेच चिखलवाडी येथे हे पावसाळ्यात होणारी घरबुडी टाळण्यासाठी नाल्याची व्यवस्था करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या .


त्याप्रमाणे नियोजित आराखड्या मध्ये पुन्हा बदल करून रेल्वेकडून परवानगी मिळवून घेतली खासदार राजन विचारेयांनी कोपरी रेल्वे पुल धोकादायक झाल्याचे रेल्वेचे पत्र हाती लागतात सर्व प्रसार माध्यमांना घेऊन दिनांक 22 जून 2017 ला त्याचा पर्दाफाश केला त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री यांचीभेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती समजली त्यानंतर 21 मे 2018 रोजी या कोपरी रेल्वे पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यातआले काम प्रगती पथावर सुरू असतानाच कोरोनाच्या प्रादुर्भावा मुळे संपूर्ण भारत देशबंद करण्यात आले असताना काम बंद  पडले होते त्यानंतर खासदार राजन विचारे यांनी या काळात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊनया महत्व कांशी प्रकल्पाचे काम सुरू केले नंतर अपुऱ्या मजुरांचा होणारा तुटवडा लक्षात घेता काम संथ गतीने सुरू होते.

 

लक्षात येताच खासदार राजन विचारे यांनी 18 नोव्हेंबर 2020 रोजी पुन्हा पाहणी करून रेल्वेच्या व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना फेज 1 च्या कोपरी पुलाची गर्डर  लॉन्च करून फेब्रुवारी मार्च पर्यंत हा पूल नागरिकांसाठी खुला करून द्या व त्यानंतर फेज २ च्या गर्डरचे काम सुरुकरण्याच्या सूचना त्या वेळी  अधिकर्याना करण्यात आला होत्या या पूलाच्या गर्डर साठी काही कालावधी साठी हा मार्ग बंद करावा लागणार होता त्यासाठी आवश्यक वाहतूक शाखेची परवानगी मिळणे आवश्यक होते त्यामुळे रेल्वेने खासदार राजन विचारे यांच्या निदर्शनास देताच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांना तात्काळ परवानगी देण्याची विनंती करण्यात आली होती.


 त्यांनी  तात्काळ सर्वे करून   एम एम आर डी ए साठी दिनांक 16/17 व 17/18  रात्र  तसेच  रेल्वे साठी दिनांक 23/24 व 24/25 ची रात्री हा मार्ग बंद करण्याच्या सूचना वाहतूक शाखेला दिल्या आहेत त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला नागरिकांना येथे सामना करावा लागणारअसल्याने सहकार्य करावे अशी विनंती खासदार राजन विचारे यांनी केली या पाहणी दौऱ्यात खासदार राजन विचारे यांनी आनंद नगर येथील भुयारी मार्ग २+२  मार्गिकेचाकरावा तसेच पुढे सरकविण्यात आलेला ज्ञानसाधना कॉलेज सर्विस रोड  ते गुरुद्वारा शेजारी असलेले मारुती मंदिरा  दरम्यान नव्याने होणाऱ्या पादचारी पुलाला लिफ्ट बसवण्यात यावी अशी मागणीची सूचना खासदार राजन विचारे यांनी  एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता  प्रकाश भांगरे यांना केली व  यासाठी पाठपुरावा सुरु ठेवणार आहे असे खासदार राजन विचारे यांच्याकडून कळविले आहे .

कोपरी पुलाची गर्डर बसविण्या साठी यंत्रणा सज्ज - खासदार राजन विचारे कोपरी पुलाची गर्डर बसविण्या साठी यंत्रणा सज्ज - खासदार राजन विचारे Reviewed by News1 Marathi on January 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads