Header AD

शारीरिक शिक्षण विषयाचा "दिल्ली पँटर्न" महाराष्ट्रात राबवा

 ■महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची शिक्षण विभागाकडे मागणी...

  

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  शारीरिक शिक्षण विषयाचा "दिल्ली पँटर्न" महाराष्ट्रात राबविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक  शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राहुल अकुलसचिव डॉ. सुनिल पवारकार्याध्यक्ष अमोलकुमार वाघमारे, ठाणे जिल्हा युवा उपाध्यक्ष जितेंद्र म्हात्रे यांनी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडे केली आहे.


शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या शारीरिकमानसिकबौद्धिकसामाजिक विकासासाठी व शिक्षण घेण्यास सक्षम होण्यासाठीसदृढ समाज निर्मितीबलशाही भारतासाठी, देशाच्या आर्थिक प्रगती साठीआँलिम्पिंक मधील पदके वाढविण्यासाठी आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांची रोगप्रतिकारक शक्ती  वाढविण्यासाठी आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाची अत्यावश्यक गरज झालेली आहेसंपूर्ण जग कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर "आरोग्य" या घटकावर अनुभव घेत आहेम्हणून "आरोग्य  व शारीरिक  शिक्षण " आणि शारीरिक शिक्षण शिक्षक यांच्यासाठी  दिल्ली  पँटर्न महाराष्ट्रात राबविल्यास फायदा होऊ शकतो असे महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक  शिक्षण शिक्षक महासंघाचे म्हणणे आहे.
दिल्ली  प्रमाणे  प्राथमिक स्तरावर  पुर्ण वेळ फिजिकल एज्युकेशन टीचर (B.P.Ed )  आल्यास महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शाळा (जिल्हा परिषद) सह सर्व  नगर पालिका शाळा, महानगर पालिका शाळामध्ये फिजिकल एज्युकेशन टीचर  यांची दिल्लीत ४२३ पदे आहेत तर महाराष्ट्राच्या लोकसंख्या व शाळा यांचा विचार करता आकडा प्रचंड मोठा होऊ शकतो. माध्यमिक स्तर शाळा तेथे शारीरिक  शि. शिक्षक आणि २५० विद्यार्थ्यांपाठीमागे एक.शि. शि. शिक्षक सह इतर प्रमुख मागण्या यशस्वी झाल्यास हजारात पदनिर्मिती तयार होतात.


उच्च  माध्यमिक स्तर  किमान ५०० विद्यार्थी व तासिका वाढ झाल्यास येथेही पदनिर्मिती होतात. परंतु हे  ध्येय व उद्दिष्टे पुर्ण करण्यासाठी अभ्यासपुर्ण मांडणीसतत पाठपुरावासर्व  शा. शि.शिक्षक संघटना यांची एकत्र ताकद यांची आवश्यकता आहे. त्यामुळे या सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे संदिप मनोरेतायाप्पा शेंडगे यांनी शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांस केले आहे.

शारीरिक शिक्षण विषयाचा "दिल्ली पँटर्न" महाराष्ट्रात राबवा शारीरिक शिक्षण विषयाचा "दिल्ली पँटर्न" महाराष्ट्रात राबवा Reviewed by News1 Marathi on January 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads