कल्याण पूर्वेत प्रथमच पार पडला मराठा वधू वर मेळावा मराठा समाज विकास मंडळाचे आयोजन
कल्याण , कुणाल म्हात्रे : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच बंद होते. आता अनलॉकमध्ये हळूहळू जनजीवन सुरळीत होत असतांना वधूवर मेळाव्यांना देखील सुरवात झाली असून कल्याण पूर्वेत पहिल्यांदाच मराठा वधू वर मेळावा पार पडला. मराठा समाज विकास मंडळाच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कल्याण पूर्वेतील गणेश विद्या मंदिर याठिकाणी रविवारी या वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या २० वर्षांपासून हा मेळावा कल्याण पश्चिम मध्ये आयोजित करण्यात येत होता मात्र यंदा प्रथमच कल्याण पूर्वेत हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात सुमारे १३० वधू वरांनी सहभाग घेतला होता. कोरोना काळात अनेक अडचणी लग्नामध्ये आल्या होत्या. मात्र आता हा वधू वर मेळावा पार पडल्याने अनेकांची यामुळे लग्न जमणार असून या मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती या मेळाव्याचे आयोजक माजी नगरसेवक शरद पाटील यांनी दिली.

Post a Comment