Header AD

भिवंडीतील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा पुरविण्याचे प्रधान सचिवांचे निर्देश


◆आमदार रईस शेख यांच्या प्रयत्नांना यश..


भिवंडी , प्रतिनिधी  :  शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे व एकमेव असलेले स्व इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात सेवा सुविधांचा बोजवारा उडल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून येत असल्याने नागरिकांच्या या तक्रारींची दखल भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी घेतली असून या रुग्णालयाच्या दुरुस्ती व इतर सोयी सुविधा तत्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांची गुरुवारी आमदार शेख यांनी भेट घेतली . यावेळी येत्या काही दिवसांमध्येच भिवंडीतील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात सर्व सेवा व सुविधा उपलब्ध करण्यात येतील असे आश्वासन राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी या भेटी दरम्यान आमदार रईस शेख यांना दिले असून त्यासंदर्भातील कारवाईचे निर्देश देखील त्यांनी संबंधित प्रशासकीय विभागांना दिले असल्याने लवकरच भिवंडीच्या नागरिकांना सर्व आरोग्य सुविछा शासनामार्फत मिळणार असल्याचे स्पष्टीकरण आमदार शेख यांनी दिले आहेत. 


भिवंडी शहरातील एकमेव रुग्णालय स्व.इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय म्हणून मान्यता मिळून देखील अनेक वर्षे येथे सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो तसेच अनेक महत्वाच्या आरोग्य सुविधांपासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे.  पाठपुरावा करून देखील समस्यांचे निराकरण होत नसल्याने आ.रईस शेख यांच्या मागणीनुसार राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री यांनी गुरुवारी मुुंबई मंत्रालायमध्ये संबंधित अधिकाऱ्यांसह संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. 


सदर बैठकीमध्ये इंदिरा गांधी रुग्णालयात डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड कोर्सेस लवकरात लवकर सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून याद्वारे रुग्णालयामध्ये विविध स्पेशालिस्ट डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत. तसेच मागील ३ महिन्यांपासून स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ उपलब्ध नसल्याने महिला व बालकांचे खूपच हाल होत असून गर्भवती मातांना प्रवास करून उपचारासाठी ठाणे किंवा मुंबईला जावे लागले त्यामुळे या रुग्णलयात ३ स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ तात्काळ उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात देखील देण्यात असून त्यांची नियुक्ती लवकरात लवकर न झाल्यास उप संचालिका व शल्य चिकित्सक ठाणे यांच्यावर कारवाई करण्याबाबत विचाराधीन असल्याचे सांगण्यात येत आहे. 


तसेच वैद्यकीय अधिकारी, रेडिओलॉजिस्ट आणि मंजूर असलेली सर्व रिक्त पदे देखील लवकरात लवकर भरण्याबाबत आदेश या बैठकीत देण्यात आले असून रुग्णालयात नादुरुस्त व बंद असलेली उपकरणे त्वरित सुरु करण्याचे निर्देश देखील राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी दिले आहेत अशी माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे. सदर बैठकीस महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, संचालक, सह संचालक तसेच  भिवंडी मनपा आयुक्त व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

भिवंडीतील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा पुरविण्याचे प्रधान सचिवांचे निर्देश भिवंडीतील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा पुरविण्याचे प्रधान सचिवांचे निर्देश Reviewed by News1 Marathi on January 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads