Header AD

बूम प्रिमीयर लीग क्रिकेट टूर्नामेंट संपन्न

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने कामोठे येथे एक दिवसीय बूम प्रिमीयर लीग क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी राष्ट्रवादीचे पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष आर. एन. यादव यांच्याहस्ते विजेत्यांना आकर्षक चषक, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.


 कामोठ्याला महाराष्ट्राच्या क्षितिजावर पहायचे असून त्यासाठी आपण सर्पोतोपरी प्रयत्न करणार आहोत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे सिद्धांत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचे असून तरुणांनी खेळ, शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सहभागी होऊन नावलौकिक करावे. तरुणांची प्रगती झाली तरच घर, परिवार आणि देशाची प्रगती होईल असे सांगत आर. एन. यादव यांनी उपस्थित तरुणांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कृष्णा मर्ढेकर, भाऊसाहेब लबडे, हर्षद गायकवाड, महेश राउत, जितेंद्र यादव आदींसह इतर मान्यवर आणि प्रेक्षक उपस्थित होते. 

बूम प्रिमीयर लीग क्रिकेट टूर्नामेंट संपन्न बूम प्रिमीयर लीग क्रिकेट टूर्नामेंट संपन्न   Reviewed by News1 Marathi on January 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads