भिवंडी शहर कचरा कुंडी मुक्त करा महापौर प्रतिभा पाटील
भिवंडी , प्रतिनिधी : भिवंडी शहराची ओळख सुंदर शहर म्हणून व्हावी यासाठी शहरातील सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असून त्यासाठी कचरा कुंडी बंद करण्याचा उपक्रम ज्या ज्या ठिकाणी होणार आहे त्या परिसरात नागरीकांनी भविष्यात कचरा न टाकता तेथील स्वच्छता व सुंदरता जपली पाहिजे असे आवाहन महापौर प्रतिभा पाटील यांनी केले आहे .
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील हिंदूस्तान गॅरेज जवळील कचरा कुंडी बंद करून त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरीक व प्रवासी यांचे करीता बस थांबा व्यवस्था करण्यात आली असून याचे उदघाटन प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रसंगी पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया,उपमहापौर इम्रान वली मोह.खान, आरोग्य विभागाचे उपायुक्त दीपक सावंत, नगरसेवक मलिक मोमीन, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड,जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुळे, प्रभाग अधिकारी दिलीप खाने , प्रभाग समिती कार्यालयीन अधीक्षक मकसुद शेख ,प्रभाग आरोग्य निरीक्षक एम.पी.विशे गोविंद गंगावणे इत्यादी उपस्थित होते.
महापौर प्रतिभा पाटील यांनी नागरिकांनी कचरा रस्त्यावर टाकू नये असे आवाहन केले, तसेच शहरातील कचरा कुंड्या बंद करून त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात यावे, व सर्व नागरिकांनी स्वच्छ भिवंडी शहर उपक्रमात सहभागी व्हावे,असे महापौर पाटील यांनी शेवटी आवाहन केले .
भिवंडी शहर कचरा कुंडी मुक्त करा महापौर प्रतिभा पाटील
Reviewed by News1 Marathi
on
January 27, 2021
Rating:

Post a Comment