Header AD

महापालिका निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर भाजयु मोचे नवनियुक्त ६० पदाधिकारी सज्ज


सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार घराघरात पोहचविणार  सारंग मेढेकर...


ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी भाजपा युवा मोर्चाने रणशिंग फुकले आहे.भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी आक्रमक होत असतानाच भाजपा युवा मोर्चाने ६० पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर केली आहे.  शिवसेनेच्या राजवटीत झालेली ठाणे शहराची दुरवस्था व भ्रष्टाचार घराघरापर्यंत पोचविण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला आहे, अशी माहिती भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सारंग मेढेकर यांनी दिली.


भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे आणि ठाणे शहर आमदार संजय केळकर यांची उपस्थिती होती.या कार्य कारिणीत संघटन सरचिटणीस पदी अक्षय तिवरामकर आणि सरचिटणीसपदी सुरज दळवी यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच २२ उपाध्यक्ष, २१ सचिव आणि १५ कार्यकारिणी सदस्य या कार्यकारिणीत नेमण्यात आले आहेत.


अतिशय जोशपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमात प्रदेश युवा मोर्चा सचिव ओमकार चव्हाण व भाजपा कार्यकारिणी सदस्य रमेश सगळे उपस्थित होते.नवीन नियुक्त्या झाल्यावर पदाधिकाऱ्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे,. या कार्यकारिणीमुळे भाजपाचे ठाणे शहरातील संघटनात्मक जाळे आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर भाजयु मोचे नवनियुक्त ६० पदाधिकारी सज्ज महापालिका निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर भाजयु मोचे नवनियुक्त ६० पदाधिकारी सज्ज Reviewed by News1 Marathi on January 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याची शुभारंभ

कळवा  , अशोक  घाग  :   प्रभाग क्रमांक 9 स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून खारीगाव येथील दत्तवाडी परिसरातील विघ्नहर्त...

Post AD

home ads