भिवंडीत नववर्ष दिनी उड्डाणपुलाचे बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलचे नामकरण
भिवंडी , प्रतिनिधी : भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात साईबाबा मंदिर टेमघर ते कल्याण नाका या दरम्यान अडीच किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल एमएमआरडीए च्या माध्यमातून बनविण्यात आले असून सदर उड्डाणपुलास हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल नाव देण्या बाबतचा ठराव महानगरपालिका सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता .या उड्डाणपुलावरून विविध राजकीय पक्षात श्रेयवादाची लढाई झाल्याने चर्चेत असलेल्या उड्डाणपुलास नववर्ष दिनी महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्या शुभहस्ते या उड्डाणपुलास स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल असे नामकरण करून त्याचा लोकार्पण सोहळा महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला .
या प्रसंगी उपमहापौर इम्रान खान ,सभागृह नेता श्याम अग्रवाल ,गटनेता विलास पाटील ,सगीवसेना गटनेते संजय म्हात्रे ,नगरसेवक मदन बुवा नाईक ,मनोज काटेकर ,बलराम चौधरी ,साखरताई बगाडे ,शिवसेना शहर प्रमुख सुभाष माने ,उपायुक्त मुख्यालय डॉ.दीपक सावंत ,अधिकारी स्थानिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . स्व.बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या हृदयातील नाव असून ,भिवंडी शहरावर त्यांचे विशेष प्रेम होते म्हणूनच त्यांच्या स्मृती जपण्याचे काम या माध्यमातून महानगरपालिका लोकप्रतिनिधींनी केले असल्याच्या भावना महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या
भिवंडीत नववर्ष दिनी उड्डाणपुलाचे बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलचे नामकरण
Reviewed by News1 Marathi
on
January 01, 2021
Rating:

Post a Comment