नगरसेवक कुणाल पाटील यांच्याहस्ते विविध ठिकाणी ध्वजारोहण
कल्याण , कुणाल म्हात्रे : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १०८ चे नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रभागमध्ये विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. आडीवली ढोकळी येथील कुणाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या येथे स्थानिक राहिवाश्याच्या उपस्थितीत कुणाल पाटील यांच्याहस्ते झेंडा वंदन करण्यात आले. तसेच नेताजी नगर, गायत्री हायस्कूल आदी ठिकाणी नगरसेवक कुणाल पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उद्योजक अनिल पाटील, सचिन माने, मनिष सिंग, वीरेश राठोड आदीसह स्थानिक रहिवाशी, शाळेतील शिक्षक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक कुणाल पाटील यांनी लहान बालकांना खाऊचे वाटप केले.
यावेळी कुणाल पाटील यांनी आपल्या भाषणांत बोलतांना सांगितले कि, डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळे सर्वांना समानतेचा अधिकार मिळाला आहे. कोविडमुळे सण उत्सव यांच्या समारंभांवर बंधन आलं आहे. अशातच पोलीस आणि इतर कोरोना योध्यानी मोलाचं कार्य केले आहे. देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. कोरोना अजूनही गेला नाही, मास्क वापरला पाहिजे, सोशल डिस्टन्स पाळलं पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी उपस्थित नागरिकांना केले. कोविडमुळे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यावर बंधन असलं तरी नागरिकांमध्ये उत्साह भरपूर आहे, त्यामध्ये कुठेही कमतरता जाणवली नसल्याचेही कुणाल पाटील यांनी सांगितले. तसेच नागरिकांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता त्याच जोमाने पुन्हा काम करणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.
Post a Comment