Header AD

अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
मुंबई, १८ जानेवारी २०२१ : मागील आठवड्यात अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने डॉलरचे वर्चस्व असलेल्या सोन्याचे महत्त्व कमी झाले. तसेच वाढत्या कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येमुळे सोन्याच्या नुकसानीवर मर्यादा आल्या. सौदी अरेबिया साथीच्या काळात उत्पादन मर्यादित ठेवत असल्याने क्रूडचे दर काहीसे वाढले. चीनमध्ये कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण आणि अमेरिकी डॉलर मजबूत झाल्याने बेस मेटलने संमिश्र संकेत दर्शवले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.


सोने: अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले. अमेरिकी ट्रेझरीत उत्पन्नात वाढ झाल्याने ग्रीनबॅकला उत्तेजन मिळाले व डॉलरचे वर्चस्व असलेले सोने इतर चलनधारकांसाठी कमी आकर्षक ठरले. अमेरिकी कामगार बाजारातील घसरण सुरुच राहिल्याने पिवळ्या धातूतील तोटा मर्यादित राहिला. अनेक अमेरिकी नागरिकांनी बेरोजगारीच्या लाभासाठी दावे केल्याने ही वाढ चिंताजनक दिसून आली. म्हणून बाजारभावनेवरही परिणाम झाला.

यासोबतच, जागतिक आर्थिक परिस्थिती खालावत असल्याने तसेच कोरोनाच्या नव्या स्वरुपाच्या वाढत्या चिंतेने सोन्यातील नुकसान मर्यादित राहिले. फ्रान्स, जर्मनी आणि चीनमधील कठोर लॉकडाऊन लागल्याने बाजारावर नकारात्मक परिणाम झाला व पिवळ्या धातूची मागणी वाढली. अमेरिकी डॉलरमध्ये निरंतर वाढ होत असल्याने सोन्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.


कच्चे तेल: अमेरिकी क्रूडसाठ्यात घट झाल्याने डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ०.२% नी वाढले. सौदी अरेबियाने अतिरिक्त उत्पन्नात घट दर्शवल्याने येत्या काही महिन्यात तेलाला आणखी आधार मिळेल. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार, अमेरिकी क्रूड स्टॉकपाइल्स ३.२ दशलक्ष बॅरलने घटले.

सौदी अरेबियाने फेब्रुवारी २०२० व मार्च २०२० दरम्यान साथीच्या प्रभावामुळे दररोज एक दशलक्ष बॅरल एवढे उत्पादन कपात चालू ठेवली. त्यामुळे तेलाच्या किंमतीला आणखी आधार मिळाला.

याउलट, कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्रिटन, चीन आणि जर्मनीसह प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांवर निर्बंध लादण्यात आले. यामुळे कच्च्या तेलाच्या अर्थकारणावर परिणाम झाला आणि तेलातील नफ्यावर मर्यादा आल्या. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे क्रूडचा वापर करणाऱ्या प्रमुख देशांमध्ये तेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे.


बेस मेटल्स: एलएमई बेस मेटलने संमिश्र परिणाम दर्शवले. निकेलने नफ्यात पुढाकार घेतला. दरम्यान, कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत वाढ आणि अमेरिकी डॉलर मजबूत झाल्याने औद्योगिक धातूंच्या नफ्यावर मर्यादा आल्या. कोव्हिड-१९ च्या रुग्णांची संख्या चीनमध्ये वाढली. हा देश सर्वाधिक धातू वापरतो, यामुळे औद्योगिक धातूच्या किंमतीवर परिणाम झाला. चीनमध्ये विषाणूची नव्याने लाट आल्याने बेस मेटलच्या मागणीवर नकारात्मक परिणाम झाला.

तथापि, जागतिक मध्यवर्ती बँकांकडून साथीचा प्रभाव रोखण्यासाठी करण्यात येणा-या अतिरिक्त प्रोत्साहनपर मदतीमुळे औद्योगिक धातूच्या किंमतींना आधार मिळाला. फिलिपाइन्समधील खाणीत वाढत्या पर्यावरणीय चिंतेमुळे अडथळे आले. परिणामी बेस मेटलचे दर वाढले.

अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले Reviewed by News1 Marathi on January 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads