वडिलांचा जीव वाचवि णाऱ्या प्रतीक्षाचे भाजप नगरसेविकेने केले कौतुक
डोंबिवली , शंकर जाधव : घरात आल्यावर दरोडेखोरांनी वडिलाच्या गळ्यावर चाकू ठेवल्याचे पाहून तिने हिम्मत न हरता धाडसाने दरोडेखोरांशी दोन हात केले. दोन पुरुष आणि एका महिलेने घरात घुसून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता.तिने वडिलांवर आणि स्वतःवरील हल्ला परतून लावल्याने दरोडेखोरांना पळून जावे लागते.त्या मुलीच्या धाडसाचे कौतुक सर्वत्र होत आहे. भाजपच्या नगरसेविका मनीषा धात्रक यांनी या मुलीची भेट घेऊन कौतुक केले. डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनजवळील सुरजमनी इमारतीत राहणारे अशोक गौरी हे निवृत्त बँक अधिकारी आहेत. अपंग असलेले अशोक गौरी हे पत्नी व मुलीसह राहतात. त्यांच्या घरी ५ तारखेला दरोडा पडला होता.याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी १२ तासाच्या आत चार आरोपींना गजाआड केले.
या दरोड्यात महिला सामील झाली होती. या घटनेने एकीकडे पोलीस गस्ती वाढविण्याची मागणी केली असताना दुसरीकडे आपल्या वडिलांची दरोडेखोराच्या तावडीतून सुटका करून त्यांना पळून जाण्यास भाग पडणाऱ्या अशोक गौरी यांची मुलगी प्रतीक्षा हिची भाजप नगरसेविकेने पाठ थोपटली.माझ्या मुलीने त्या परिस्थितीत हिम्मत दाखवली म्हणून मी जिंवत आहे असे तिच्या वडिलांनी सांगितले. तर नगरसेविका मनीषा धात्रक म्हणाल्या,अश्या धाडसी मुलीचे कौतुक केले पाहिजे.तर नगरसेविका धात्रक यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वपोनि संजय साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बडणे,पोलीस नाईक कुरणे, पोलीस शिपाई कुंदन भांबरे, मनोज बडगुजर आणि भगवान सांगळे यांचीही भेट घेऊन त्यांनी दरोड्यातील आरोपींना १२ तासाच्या आत अटक केल्याबद्दल कौतुक केले.

Post a Comment