भाजप जनसंपर्क कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी आमदार रवींद्र चव्हाण
डोंबिवली , शंकर जाधव : भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्र.७७ दत्तनगर येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी, डोंबिवली पूर्व मंडळ सचिव मनोज पाटील, शहर उपाध्यक्ष उमेश साळवी, कल्याण जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेंद्र बहनवाल, हेमंत बावस्कर,वाॅर्ड अध्यक्ष सुधीर राणे,मोहन नायर, मितेश पेणकर, महिला पदाधिकारी पूनम पाटील ,मितेश पेणकर, शहर उपाध्यक्ष उमेश साळवी, सुधीर राणे, राजेंद्र बहनवाल ,शरद जैन,हेमंत भारस्कर, गीता कर्मलकर ,मंदार अष्टेकर ,राजेश विचारे, वीरेंद्र कनोजिया, पदाधिकारी,कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार चव्हाण यांनी भाजप जनसंपर्क कार्यालय हे कायम जनतेच्या सेवेसाठी आहे असे सांगितले. ते पुढे म्हणाले,देशाची सेवा हेच भाजप आजवर करत आली आहे हे सर्व जनतेला माहित आहे. आज भाजपचे पदाधिकारी मनोज पाटील यांनी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले झाले आहे. या कार्यालयात जनतेने आपल्या समस्या सांगितल्या तर त्या सोडविण्याच्या नक्कीच प्रयत्न करू. तर डोंबिवली पूर्व मंडळ सचिव मनोज पाटील म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण हे जनतेसाठी दिवसरात्र काम करत आहे. भाजपचे जनसंपर्क हे जनतेसाठी आहे.

Post a Comment