Header AD

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पारनाका येथे अभिवादन

 



कल्याण , कुणाल म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने पारनाकाकल्याण पश्चिम येथे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमा नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


युवकांना प्रोत्साहित करणारे आणि युवकांना स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्या दिशेने चालायला लागा असा संदेश देणारे स्वामी विवेकानंद हे भारतालाच नव्हे तर अवघ्या जगाला मिळालेले महान व्यक्ती आहेत. युवकांना संघटित करून परिवर्तन आणि उज्वल भारत घडविण्याचे त्यांचे स्वप्न होतेआत्मनिर्भर भारताचेही बीज स्वामीजींच्या विचारातच रुजले होते. युवकांनी त्यांचे विचार आपल्या जीवनात अंगिकारले तर भारत सुजलाम सुफलाम होईल असे मत कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमा नरेंद्र पवार यांनी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.


यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवारसहाय्यक जनसंपर्क अधिकारी माधवी फोपळेउपसचिव किशोर शेळकेप्रभाग अधिकारी भागाजी भांगरे आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पारनाका येथे अभिवादन स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पारनाका येथे अभिवादन Reviewed by News1 Marathi on January 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads