वीज मीटर कापण्या अगोदर इमारतीच्या अध्यक्षांंना भेटण्याची सूचना
डोंबिवली , शंकर जाधव : लॉकडाऊन मध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.मात्र वीज बिलाची रक्कम वाढली.यामुळे वीजग्राहक पुरते वैतागले असून अनेक राजकीय पक्षांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला.जादा वीज बिल आल्याने काहीना वीज बिल भरावे कसे असा प्रश्न पडला आहे. पंरतु ज्या वीज ग्राहकांनी वीज बिल नाही त्यांचे मित्र कापा असे आदेश वीजवितरण कंपनीने काढले.
यावर तोडगा डोंबिवलीतील एका इमारतीच्या सोसायटीने काढला आहे.डोंबिवली पश्चिमेकडील अनंत कृपा इमारतीच्या मीटर बॉक्सवर एक सूचना देणारे पत्र लावण्यात आले आहे. जर एखद्या सभासदाने वीज बिल भरले नसेल तर त्या सभासदाचे वीज मीटर न कापता सोसायटीचे अध्यक्ष तथा मनसे विभाग सचिव गणेश कदम यांना संपर्क साधावा असे पत्रात लिहिले आहे.दरम्यान या पत्राचा वीज वितरण कंपनीचे अधिकारी विचार करतील का असा प्रश्न उपस्थित होते आहे.

Post a Comment