ज्वेलर्स चोरीच्या घटनांवर होऊ नये म्हणून पोलीस ठाण्यात ज्वेलर्स दुकान दारांमध्ये जन जागृती पर बैठक
डोंबिवली , शंकर जाधव : लॉकडाऊनमध्ये चोरोच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शहरातील ज्वेलर्स चोरीच्या घटना घडू नये म्हणून पोलिसांनी ज्वेलर्स दुकानदारांमध्ये जनजागृती करण्याचे ठरविले आहे. यासाठी रामनगर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी ज्वेलर्स दुकानदारांची बैठक पार पडली.
या बैठकीत ज्वेलर्स दुकानदारांनी कोणत्या सूचनांचे पालन करावे यांची थोडक्यात माहिती देण्यात आली.यावेळी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याचे
या बैठकीत रामनगर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी ज्वेलर्स दुकानदारांना आपले दुकान सुरक्षित कसे राहू शकतील याची माहिती दिली. ज्वेलर्स दुकानदारांबाहेर सीसीटीव्ही लावणे,सायरन मोठ्या आवाजाचे सायरन बसावा, दुकानाबाहेर सुरक्षा रक्षक नेमा आशय सूचना त्यांना देण्यात आल्या.बैठकीत उपस्थित ज्वेलर्स दुकानदाराबाहेर रात्रीच्या वेळी गस्ती वाढवा अशी सूचना केली.
यावर डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनि सचिन सांडभोर यांनी शहरात पोलीस गस्त सुरु असून त्यात आणखी वाढ करू असे आश्वासन दिले.तर डोंबिवली ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सागरमल जैन यांनी शहरातील ज्वेलर्स दुकानदारांमध्ये चोरीच्या घटना वाढू नये म्हणून आमचे पोलिसांना सहकार्य असते. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे आम्ही नक्की पालन करू. तर शहरातील ८० टक्के ज्वेलर्स दुकानदारांच्या बाहेर सीसीटीव्ही लावल्याचे सांगितले

Post a Comment