महाविकास आघाडीच्या काळात महिलांचे सक्षमीकरण खासदार प्रियंका चतुर्वेदी
भिवंडी , प्रतिनिधी : महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून महिलाच्या उदरर्निवाहसह सक्षमीकरणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्य सरकारचे कार्य सुरूच आहे. अश्या कार्याचे उदघाटन होणे माझे मी भाग्य समजते असे प्रतिपादन शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भिवंडी केले. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने भिवंडी येथे "नारीशक्ती गारमेंट्स युनिट” चे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
कापडाचे मँचेस्टर शहराला नवी झळाळी देण्यासाठी उपयोगी ...
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने भिवंडी येथे "नारीशक्ती गारमेंट्स युनिट" तिसर्या युनिटचे उद्घाटन महिला विकास विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ताई ठाकरे व खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या हस्ते करण्यात आले. यापूर्वी पासूनच संस्थेने भिवंडी ग्रामीण आणि अल्पसंख्यक महिला सशक्तीकरण कार्यक्रम, गारमेंट या अंतर्गत दोन घटकांना महिलांना रोजगार देण्याचे काम सुरु केले आहेत. कापडाचे मँचेस्टर शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात आता कपड्यांचा उद्योग कुठेतरी डबघाईला येताना दिसत होता.
मात्र संस्थेने सुरू केलेले महिलांसाठी हे युनिट येणाऱ्या काळात कपडा उद्योगला नवी झळाळी देण्यासाठी उपयोगी ठरून भिवंडी शहरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हा एक मोठा प्रयत्न असल्याचे मत महिला आर्थिक विकास महामंडळ, अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच या युनिटमध्ये सद्याच्या स्थितीत ४५० महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. तर यापूर्वीही ठाणे जिल्ह्यातील आनगावं येथील एका कंपनीशी करारनामा करून महिलासाठी रोजगार देऊन भिवंडी तालुक्यातील भिनार गावातही "नारीशक्ती गारमेंट्स युनिट" सुरु केल्याची माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमाची सुरवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांचा मेळाव्यासह सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भिवंडी तालुक्यातील महिला उपस्थित होत्या.

Post a Comment