Header AD

अखेर आम आदमी पक्षानेच केले स्मशान भूमीच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम पालिका प्रशासनाचे दुर्लक्षच
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्मशानभूमीची संरक्षण भिंत पडून शौचालयाचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र  हे बांधकाम लहान मुलांची हिंदू दफनभूमी जागेवर होत असल्याने आणि संरक्षण भिंत नसल्याने याठिकाणी भटके कुत्रे येऊन प्रेत उकरण्याची शक्यता होती. हि बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही याठिकाणी कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर आम आदमी पक्षाने याठिकाणी स्वखर्चाने भिंत बांधली आहे.  

 

कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी येथील हिंदू स्मशानभूमीची संरक्षण भिंत पडून शौचालयाचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. शौचालयाचे बांधकामांच्या जागेवर हिंदू लहान मुलांची दफनभूमी असून संरक्षण भिंत पडल्याने भटके कुत्रे दफन केलेले प्रेत उकरून काढून त्याची विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हि सवंरक्षण भिंत लवकरात लवकर बंधने गरजेचे होते. 


गेल्या वर्षभरापासून पालिकेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यत आला होता. तसेच जानेवारी महिन्यात १० दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने स्मशानभूमीचे संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती धनंजय जोगदंड यांनी दिली. 

अखेर आम आदमी पक्षानेच केले स्मशान भूमीच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम पालिका प्रशासनाचे दुर्लक्षच अखेर आम आदमी पक्षानेच केले स्मशान भूमीच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम पालिका प्रशासनाचे दुर्लक्षच Reviewed by News1 Marathi on January 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads