युतीमुळे ठाण्यात शिवसेनेचा महापौर झाला ; मात्र आता चित्र बदलेले दिसणार आशिष शेलार यांचा विश्वास
ठाणे, प्रतिनिधी : ठाण्याच्या इतिहासात भाजप आणि शिवसेनेच्या युतीमुळेच शिवसेनेचा महापौर आतापर्यंत झाला, मात्र आता हे चित्र बदलेले सर्वांना दिसणार असून ठाण्यात भाजपचा महापौर बसणार असा विश्वास भाजपचे ठाणे प्रभारी आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला. कोपरी येथे भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी शेलार देवीच्या दर्शनासाठी आले असताना त्यांनी हे विधान केले. तसेच ठाण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना लोकांमध्ये जाऊन समाजसेवा करण्याचा सूचना यावेळी शेलार यांनी दिल्या.
ठाण्यातील कोपरी येथे संत तुकाराम मैदानात नगरसेवक भरत चव्हाण यांच्या वतीने दरवर्षी सहस्त्रचंडी नवकुण्डीय महायज्ञाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे 15 वे वर्ष असून मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. यंदा कोरोनाचे संकट असल्याने आरोग्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी कोरोना काळात समाजासाठी काम करणाऱ्याचा विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दरम्यान शेवटच्या दिवशी भाजप आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच भरत चव्हाण यांनी केलेल्या या भव्य आयोजनाचे कौतुक शेलार यांनी केले. त्यानंतर माध्यमाशी बोलताना आशिष शेलार यांनी संवाद साधला.
भंडारा येथील घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे - आशिष शैलार
भंडारा येथील घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. राज्य सरकारच्या सर्व हॉस्पिटल्समध्ये दिरंगाई होते बेपरवाई होते हॉस्पिटलचा ऑडिट,इन्फ्रास्ट्रक्चर या सर्व गोष्टीमध्ये दिरंगाई होत आहेत. या दुर्दैवी घटनेची सात दिवसात चौकशी झाली पाहिजे आणि सात दिवसात जे कोणी दोषी आहेत त्यांना कडक शासन होवून परिवाराला जास्तीत जास्त मदत झाली पाहिजे हे आमची मागणी आहे असं मत भंडारा दुर्घटनेवर आशिष शेलार यांनी व्यक्त केले.
नामांतर वरून वाद
तर मुख्यमंत्री सेक्युलॅरिझम मध्ये बसत नाही असं म्हणायचं जे औरंगजेबीची वृत्तीने आणि औरंगाबादच म्हणू अशा लोकांबरोबर सत्तेला मांडीला मांडी लावायची ते मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वात बसता का? असा सवाल यावेळी शेलार यांनी करत टोला देखील संभाजीनगर या वादावरुन आशिष शैलार यांनी लगावलाय.
बिघडलेल्या आघाडीने राज्याला बिघडू नये
महाविकासआघाडी पहिल्यापासून बिघाड आहे. सकाळ बिघाड,दुपार बिघाड, संध्याकाळ बिघाड, रात्री बिघाड आणि बिघडलेली आघाडी असल्याने यांनी या राज्याला बिघडू नये एवढीच आमची इच्छा असल्याचे यावेळी आशिष शेलार यांनी सांगितले.

Post a Comment