शॉपमॅटिक द्वारे ७ दशलक्ष डॉलर्स महसूल प्राप्तीची नोंद
मुंबई, ११ जानेवारी २०२१ : शॉपमॅटिक या अग्रगण्य ई-कॉमर्स सक्षमक कंपनीने अपेक्षित उद्दिष्टापेक्षा ४० टक्क्यांनी वृद्धी घेत एप्रिल-डिसेंबर २०२० या कालावधीत ७ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त महसूलाची नोंद केली आहे. सतत उच्चांकी दिशेने प्रगती करणाऱ्या शॉपमॅटिक या कंपनीने देशातील एसएमई आणि उद्योग क्षेत्रासाठी नुकतेच तंत्रज्ञान आधारीत अनेक सोल्युशन्स लाँच केले. कंपनीने अपेक्षा केलेल्या ईबीआयटीडीएचे उद्दिष्ट एक वर्ष आधीच सकारात्मकरित्या गाठले आहे. सिंगापूर, भारत, मलेशिया आणि हाँगकाँग या देशांतील ग्राहकांकडून कंपनीने मोठी मागणी अनुभवली. कोव्हिड-१९ च्या प्रभावामुळे डिजिटल लाटेला अधिक वेग मिळाला, हेच यातून दिसून येते.
शॉपमॅटिकचे सह संस्थापक व सीईओ श्री अनुराग अवुला म्हणाले, “ २०२० हे वर्ष सकारात्मक स्थितीत संपवताना आम्हाला खूप आनंद होत आहे आणि २०२१ मध्ये सिंगापूर, भारत, मलेशिया आणि हाँगकाँगमधील स्थानिक व्यवसाय तसेच उद्योजकांना डिजिटाइज होण्यासाठी अधिक प्रभावी योजना आखत आहोत. आमच्या संस्थेची उद्दिष्टे पुढील टप्प्यात नेण्यासाठी तसेच दक्षिण-पूर्व आशियातील नव्या बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याच्या दिशेने प्रमुख स्रोतांसाठी महत्त्वाची गुंतवणूक मिळवण्याचेही आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शॉपमॅटिकमध्ये आम्ही शाश्वत आणि फायदेशीर व्यवसाय करण्यावर लक्ष केंद्रित करतो. आमच्या नियोजनाच्या एक वर्ष आधीच आम्ही आमची उद्दिष्टे गाठू शकल्याने आम्हाला अधिक आनंद होत आहे.”
मे २०२० मध्ये शॉपमॅटिकने ग्रॉसरी/किराणा दुकानांना ऑनलाइन जाण्यासाठी स्पेशल सोल्युशन आणले. भारत आणि सिंगापूरमधील व्यावसायिकांनी याचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार केला. जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीने मागील तिमाहितील जीएमव्हीच्या तुलनेत व्यवहारांमध्ये ८०% वृद्धी अनुभवली. डिसेंबर २०२० णध्ये, शॉपमॅटिकने वैयक्तिक उद्योजक व एसएमईंसाठी ईकॉमर्स सोल्युशन्सची नवी श्रेणीच लाँच केली. यात शॉपमॅटिक चॅट, शॉपमॅटिक सोशल, शॉपमॅटिक वेबस्टोअर आणि शॉपमॅटिक मार्केटप्लेस असे चार पर्याय त्यांना उपलब्ध करून देण्यात आले. या वर्षी कंपनीचा विस्तार दक्षिण-पूर्व आशियातील देशांमध्ये करण्याची योजना आहे. याच दिशेने सरीज बी फेरीत निधी उभा करण्यासाठी विविध गुंतवणुकदारांसोबत सकारात्मक चर्चादेखील सुरु आहे.

Post a Comment