Header AD

बँकेच्या खातेदारांच्या ऑनलाईन बँकिंग बाबत सतर्कता ही बँकेची जबाबदारी वाढत्या सायबर गुन्ह्यांवर पोलिसांची करडी नजर

 डोंबिवली , शंकर जाधव  :  लॉकडाऊन मध्ये नागरिकांची ऑनलाईन बँकिंकचा वापर करत असताना फसवणूक होत असल्याच्या गुन्हात कमालीची वाढ झाली आहे.यावर जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी सतर्क रहा, आपल्या खात्याची माहिती फोनवर देऊ नका असे आवाहन केले आहे.यासंदर्भात माहिती देण्यासाठी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. बँकेच्या खातेदारांच्या ऑनलाईन बँकिंगबाबत सतर्कता ही बँकेची जबाबदारी असल्याचे सांगत बँकेचा गंभीरतेचा अभाव असल्याचे रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनि सचिन सांडभोर यांनी सांगितले. त्यामुळे वाढत्या सायबर गुन्ह्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे दिसते.  


आपल्या खात्याची माहिती देताना सतर्कता बाळगली जात नसल्याने सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. सुरक्षितता आणि सावधान हे बँकेच्या खातेदाकरांनी लक्षात ठेवूनच व्यवहार करावे असे यावर भर दिला जातो. मात्र लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन बँकिंगबाबत फसवे कॉल येत असल्याचे खातेदारांना खोटी माहिती देत त्यांच्या खात्याची माहिती घेतली जाते. इतकेच नव्हे तर खातेदाराच्या खात्यात जेवढी रक्कम आहे ती तर वळती होतेच त्याचबरोबर त्या खातेदाराच्या नावाने कर्ज काढले जाते. त्यामुळे खातेदाराला आपली फसवणूक झाल्याचे समजतात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातात.यावर सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी जनतेकडून मदतीचा हात मागितला आहे.याबाबत माहिती देण्यासाठी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनि सचिन सांडभोर यांनी याबाबत माहिती देताना लॉकडाऊनमध्ये रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यातील फक्त २ टक्के गुन्ह्याची उकल झाल्याचे सांगितले. 


डोंबिवलीत घरोघरी सायबर गुन्ह्याबाबत जनजागृतीचे पत्रक वाटप केले जाणार आहे. सायबर गुन्ह्यासंदर्भात पत्रकारांनी बँकेच्या खातेदारांची फोन करून अथवा ऑनलाईन बँकिंगच्या मार्फत फसवणूक थांबविण्यास पोलीस का यशस्वी होत नाही असे विचारले असता यावर अद्याप तरी यंत्रणा सक्षम नसून फसवणुकीचे फोन नंबर कुठे आले व कोणाच्या नावाने नोंद आले याची माहिती मिळत नसल्याचे सांगितले. दरम्यान शहरी भागात अश्या प्रकारची जनजागृती होत असून खेडेगावातील बँक खातेदारांमध्ये जनजागृती कशी करणार यावर मात्र राज्यातील अनेक ग्रामीण भागातील पोलीस कमी पडत दिसते. तर बँकेने याबाबत अधिक सर्तकता दाखवावी अशी अपेक्षा पोलीस व्यक्त करत आहे.नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून केले असले तरी अश्या गुन्ह्यात आरोपी पकडणे हे पोलिसांसमोर एकप्रकारचे आव्हानच ठरले आहे.

बँकेच्या खातेदारांच्या ऑनलाईन बँकिंग बाबत सतर्कता ही बँकेची जबाबदारी वाढत्या सायबर गुन्ह्यांवर पोलिसांची करडी नजर बँकेच्या खातेदारांच्या ऑनलाईन बँकिंग बाबत सतर्कता ही बँकेची जबाबदारी वाढत्या सायबर गुन्ह्यांवर पोलिसांची करडी नजर  Reviewed by News1 Marathi on January 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads