Header AD

नवीन धोरणा नुसार कृषिपंप वीज जोडणी व थकबाकी वसुलीला गती द्या


सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांचे निर्देश; बांधावर पोहचत दिले नवीन कनेक्शन...


पालघर, २१ जानेवारी २०२१  : शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण-२०२० नुसार कृषिपंपांना वीजजोडण्या देणे, कृषिपंपाच्या अनधिकृत वीजजोडण्या अधिकृत करणे या कामांना तसेच तब्बल पन्नास टक्के सवलतीच्या संधीचा लाभ देऊन कृषिपंपाची थकबाकी वसुली करण्याच्या कामास गती देण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके (आयएएस) यांनी दिले आहेत. सहव्यवस्थापकीय संचालक बोडके यांनी पालघर तालुक्यात शेतकऱ्याच्या थेट बांधावर पोहचत कृषिपंपाला नवीन वीजजोडणी दिली. तसेच पन्नास टक्के सावलीचा लाभ घेऊन कृषिपंपाची थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून वीजबिलाचा धनादेश स्वीकारला. 


३१ मार्च २०१८ नंतर पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना वीजजोडणी देण्यासाठी शासनाने नवीन धोरण आणले आहे. या महत्वाकांक्षी निर्णयाची काटेकोरपणे व प्राथमिकता देऊन अंमलबजावणी करण्याचे निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक बोडके यांनी कोकण प्रादेशिक विभागांतर्गत भांडुप, कल्याण, नाशिक, रत्नागिरी आणि जळगाव परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत. 


धोरणाच्या अनुषंगाने वीज खांबांपासून ३० मीटरच्या आतील कृषिपंपांना तातडीने वीजजोडण्या देण्याचे निर्देश ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी नुकतेच दिले. त्यांच्या निर्देशानुसार पालघर तालुक्यातील बहाडोली येथील जनार्दन चिंतामण किणी दाम्पत्याच्या शेतावर पोहचत सहव्यवस्थापकीय संचालक बोडके यांच्या हस्ते नवीन वीजजोडणी देऊन कोकण प्रादेशिक विभागात कृषिपंपाना वीजजोडणी देण्याच्या कामाचा शुभारंभ केला. 


नवीन वीजजोडणीमुळे शेती अधिक किफायतशीर ठरणार असल्याचा आनंद किणी दाम्पत्याने यावेळी व्यक्त केला. कृषिपंपाच्या वीजबिल थकबाकी वसुलीसाठी तब्बल पन्नास टक्के सवलतीची योजना महावितरणने आणली आहे. या योजनेचा लाभ घेत तमसाई (ता. पालघर) येथील अनंत भास्कर पाटील यांनी दिलेला त्यांच्या कृषिपंपाच्या थकबाकीचा धनादेश सहव्यवस्थापकीय संचालक बोडके यांनी स्वीकारला व योजनेचा लाभ घेण्यासाठी इतरांना प्रोत्साहित करण्याबाबत सूचित केले.


याप्रसंगी कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, प्रादेशिक कार्यालयातील अधीक्षक अभियंता अनिल घोगरे, महाव्यवस्थापक अनिल बऱ्हाटे, उप व्यवस्थापक योगेश खैरनार, पालघरच्या अधीक्षक अभियंता किरण नागावकर, कार्यकारी अभियंते किशोर उईके, जगदीश इंगळे, प्रताप मचिये, युवराज जरग यांच्यासह अधीकारी उपस्थित होते.


नवीन धोरणा नुसार कृषिपंप वीज जोडणी व थकबाकी वसुलीला गती द्या नवीन धोरणा नुसार कृषिपंप वीज जोडणी व थकबाकी वसुलीला गती द्या Reviewed by News1 Marathi on January 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads