पालिकेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
ठाणे, प्रतिनिधी : भिवंडी महापालिकेत आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, उप अभियंता संदीप सोमाणी, प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त नितीन पाटील, परवाना विभाग प्रमुख ईश्वर आडेप, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, पाणी पुरवठा विभाग कार्यालय अधीक्षक मनोहर लोकरे,जनसंपर्क कार्यालयातील लिपिक तुषार भालेकर, कालुराम पोकळा,उपस्थित होते.यावेळी करोना च्या कठीण काळात घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केल्याबद्दल काही माध्यमिक शिक्षक वर्ग यांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment